करमाळा_चौफेर (शंभू फरतडे ✍️)
लोकसभा व विधानसभेत महिलांसाठी 33 टक्के आर क्षणाची 2029 पासून अंमलबजावणी करण्याबाबतच्या घटनादुरुस्तीला संसदेत विरोधी पक्षांनी विरोध दर्शवल्याच्या निषेधार्थ करमाळा येथील दत्त मंदिर चौकात बुधवार, दि. 30 एप्रिल रोजी जनआक्रोश आंदोलन पार पडले.
भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष रश्मी बागल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात विविध क्षेत्रातील महिला, पदाधिकारी व मान्यवरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
पंचायत समिती सभापती पूजा ढेरे, पं.स. सदस्य सोनाली तकिक, नगरसेविका लता घोलप, स्वाती फंड, वैशाली लवंड, अनिता यादव, ज्योती घोलप, साधना घोलप, मेघा लावंड आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
तसेच भाजप जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे , नगरसेवक दीपक चव्हाण , मकाईचे चेअरमन दिनेश भांडवलकर, संचालक सतीश निळ ,मंडल अध्यक्ष सचिन पिसाळ, काका सरडे, नितीन तकिक, सचिन घोलप, अमोल जरांडे, रेवननाथ फरतडे, रेवणनाथ निकत, युवराज मगर, रामचंद्र राऊत, रविकिरण माळवे, प्रशांत जगदाळे, प्रदीप वाघमोडे आदी मान्यवर सहभागी झाले होते.
यावेळी भाजप महिला मोर्चा च्या प्रदेश उपाध्यक्षा व जिल्हापरिषद गट नेत्या रश्मी बागल यांनी पत्रकारांशी बोलताना महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधकांनी घेतलेल्या भूमिकेचा तीव्र निषेध केला. संसदेत महिलांच्या हक्काला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांचा धिक्कार’ करत आंदोलनातून संताप व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शुभम बंडगर यांनी केले.

