June 3, 2026
IMG-20260603-WA0042

करमाळा_चौफेर

जिल्हा परिषदेच्या भाजप गट नेत्या रश्मी बागल व भाजप नेते दिग्विजय बागल यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा बुधवार दि. ०३ रोजी उत्साहात पार पडला.भाजप नेते दिग्विजय बागल यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. विविध विकासकामांसाठी सुमारे २७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

वाशिंबे ते नवीन रेल्वे भूयारी मार्ग काँक्रीटीकरणे ८लक्ष, 

●नवीन रेल्वे भूयारी मार्ग ते वाशिंबे रस्ते दुतर्फा स्ट्रीट लाईट बसविणे ५ लक्ष, 

●बापू बोबडे वस्ती ते शेख सर वस्ती काँक्रीट करणे १० लक्ष, 

●नवयुग तालीम जिम साहित्य लोकार्पण ४लक्षया कामासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. यावेळी बागल म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकहिताची कामे सातत्याने राबविण्यात येत आहेत. ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देत भविष्यातही विकासकामे करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी मकाई चे सचांलक गणेश भाऊ झोळ,बाळासाहेब पांढरे,काशीनाथ काकडे,संतोष पाटील, रेवनाथ निकत,कल्याण शिंदे , भाऊसाहेब झोळ,सोमनाथ झोळ,रणजित शिंदे,अजित झांजुर्णे,हर्षवर्धन पाटील,राजाभाऊ जगदाळे , नाना झाकणे ,शैलेश झोळ,दत्तात्रय कुलकर्णी, दिलीप ढेरे,सोनवणे सर , विलास झोळ,शंकर कांबळे,अंगत झोळ,दिग्विजय पवार,जयदीप झोळ इ मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

●श्रद्धेच्या स्थानाला हक्काची जमीन मिळवून देणार●

 श्रद्धास्थान श्री. भैरवनाथ महाराज मंदिराच्या विकासासाठी हक्काची जमीन मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करुन निधी उपलब्ध करण्यासाठी कटिबद्ध आहोत.” असे बागल यांनी सांगतीले ,तसेच येथील विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही.यापूर्वी मा.आ शामलताई बागल यांच्या कार्यकाळात ३३/११ केव्ही सबस्टेशन, भैरवनाथ मंदिर ‘क’दर्जा व सभागृह तसेच स्व. मामांच्या प्रयत्नांतून पशुवैद्यकीय दवाखाना व समाजमंदिराची उभारणी झाली.” “गटनेत्या रश्मी बागल यांच्या प्रयत्नातून जेऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र वाशिंबे येथे स्थलांतरास मंजुरी मिळाली आहे. — (दिग्विजय बागल, भाजप नेते)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *