October 13, 2026
IMG-20261013-WA0029

करमाळा चौफेर

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षणाची समान संधी मिळावी, यासाठी करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून सेमी-इंग्रजी शिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजप नेते दिग्विजय बागल यांच्या पुढाकाराने करमाळा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात यासंदर्भात शिक्षण विभागाची आढावा बैठक पार पडली.आजच्या स्पर्धात्मक युगात इंग्रजीचे ज्ञान विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरापासूनच इंग्रजीचा परिचय होईल आणि त्यांचा पाया मजबूत होईल. तसेच जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढून पटसंख्या वाढण्यासही मदत होणार आहे.या बैठकीला पंचायत समिती सभापती पूजाताई ढेरे, सदस्य भरत अवताडे, नानासाहेब झाकणे, संध्याताई कांबळे, गटशिक्षणाधिकारी रिंकल हाडके यांच्यासह तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख उपस्थित होते.ग्रामीण विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची समान संधी देणे, जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावणे आणि भविष्यातील स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना सक्षम करणे, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे बागल यांनी यावेळी सांगितले. आचारसंहिता संपल्यानंतर या उपक्रमाच्या अंमलबजावणीला गती देण्याचे नियोजन बैठकीत करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *