करमाळा_चौफेर (शंभू फरतडे✍🏻)
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व अजितदादा पवार व करमाळा तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा तालुक्यातील गुळसडी येथे भव्य एक बैल व एक दुसा मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे.उद्या दि.रविवार दि. 23 ऑगस्ट 2026 रोजी, सकाळी ठीक 9.00 वाजता मा.आ. जयवंतराव जगताप साहेब फार्म हाऊस खंडागळे पाटी गुळसडी, ता. करमाळा, जि. सोलापूर येथे या स्पर्धा पार पडणार आहेत. आदर्श सरपंच – यशवंत भैय्या शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा व माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
हे मैदान पश्चिम महाराष्ट्र पुरतेच मर्यादित राहील व सदरील मैदान शासनाच्या, अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या नियमानुसार होईल असे आयोजकांकडून सांगण्यात आले. या स्पर्धेसाठी प्रवेश फी – 1200 रु. ठेवली असून पहिले बक्षीस रोख – 1,05,555/- रोख व मानाची ढाल,दुसरे बक्षीस – 85,555/- मानाची ढाल,तिसरे बक्षीस, 65,555/- मानाची ढाल,चौथे बक्षीस – 55,555/- मानाची ढाल,पाचवे बक्षीस – 45,555/- मानाची ढाल,सहावे बक्षीस – 35,555/- मानाची ढाल,सातवे बक्षीस – 25,555/- मानाची ढाल ,आठवे बक्षीस – 11,555/- मानाची ढाल नववे बक्षीस – 10,555/- मानाची ढाल असे बक्षीसासांचे स्वरूप असणार आहे.
क्वार्टर फायनल साठी ,पहिले बक्षीस रोख 2,000/- व सन्मान चिन्ह,दुसरे बक्षीस रोख 2,000/- व सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे तर ,तिसरे बक्षीस रोख 2,000/- व सन्मान चिन्ह,चौथे बक्षीस रोख 2,000/- व सन्मान चिन्ह, पाचवे बक्षीस रोख 2,000/- व सन्मान चिन्ह, सहावे बक्षीस रोख 2,000/- व सन्मान चिन्ह,सातवे बक्षीस रोख 2,000/- व सन्मान चिन्ह असे असणार आहे. तर मेगा फायनल ला प्रत्येकी 1000/- व सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे.
समालोचक म्हणून – मा. श्री. संपत वाघमोडे यांचे उत्कृष्ट समालोचन कार्यक्रमाची रंगत वाढवणार आहे.तर या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण LIVE – शिवरत्न कुस्ती दंगल समूह करणार आहे. डोंडा पंच – पै. पप्पू मंडले असणार आहेत.
●नियम व अटी -●
1. पंचाचा निर्णय अंतिम राहील. नैसर्गिक आपत्तीस यात्रा कमिटी जबाबदार राहणार नाही.
2. बैलास मारहाण केल्यास व नियमाचे उल्लंघन केलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जाईल.
3. मैदानात कोणतीही इजा आल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही.
4. मैदान सकाळी ठीक 9.00 वाजता सुरु होईल.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाबाराजे जगताप , सचिन खपारे , संतोष कापरे सर, सुरेश शिंदे , युवराज शिंदे , अक्षय इंगळे , बालाजी मेहेर, आण्णासाहेब ढाणे, सदस्य जिल्हा परिषद सोलापूर, सदस्य, मानसिंग खंडागळे , आशिष आण्णा गायकवाड , तुषार शिंदे , डाॅ. विकास वीर सर – योगेश भंडारे, सुनिल शिंदे, विकास शिंदे , श्रीकांत चौधरी , गणेश येळे , प्रदिप पाटिल , श्रीराम हेरे देवळाली , सुरज हेरे , पुष्पक हेरे, (राणा बैल मालक) प्रयत्नशील आहेत.
करमाळा तालुक्यातील हे पहिलेच भव्य मैदान ठरणार आहे.त्यामूळे बैलगाडा शर्यत शौकिणांसाठी मोठी पर्वण असणार आहे 
