August 16, 2026
IMG-20260816-WA0044(1)

करमाळा_चौफेर

करमाळा तालुक्यात अनाधिकृत बोगस डिपी बसवूण शेतकऱ्यांसह महावितरण ची फसवणूक करणाऱ्या ठेकेदारांचा घोटाळा उघड होणार  असून महावितरण कडून बोगस डिपींचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. बोगस डिपीमुळे टंचाई व लोडशेडिंग वाढत असून अधिकृत कोटेशन भरून कनेक्शन घेणाऱ्या शेतकऱ्यांना वीज टंचाई चा भार सोसावा लागत असल्याने अशा ठेकेदारांवर कारवाई करावी या  मागणी साठी युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी उपोषणाचा इशारा दिला होता.

या निवेदनाची दखल घेऊन आठ दिवसांत बोगस डिपींचा सर्वे करून संबंधित ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन जेऊर व करमाळा उपविभागाच्या कार्यकारी उप अभियंत्यानी दिल्यानंतर फरतडे यांनी सदरचे उपोषण तुर्तास स्थगित केले आहे. आश्वासनानुसार  ठेकेदारांवर कारवाई करून लायसन्स रद्द न केल्यास महावितरणच्या करमाळा व जेऊर उपविभागा विरोधात करमाळा तहसील समोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे .

ठेकेदार व डिपी देखील बोगस?

महावितरण कार्यालयाने लेखी पत्र दिल्या शिवाय कंपनी डिपी देत नाही परंतु ज्यांच्याकडे डिपी बसवण्याचं लायसन्स नाही अशा लोकांनी देखील शेतकऱ्यांकडून लाखो रूपये घेऊन बोगस डिपी बसवले आहेत .जुण्या डिपीला रंगरंगोटी करून डुप्लिकेट कंपनी नेमप्लेट लावून यांना डिपीचा पुरवठा होत असल्याची शक्यता असून करमाळा तालुक्यातच असे डिपी उपलब्ध होत असल्याची चर्चा आहे. बसवलेले डिपी ठेकेदारांने कोणत्या कंपनीकडून खरेदी केले आहेत, कोणाच्या परवानगीने खरेदी केले आहेत याची देखील चौकशी व्हावी अशी मागणी समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *