July 28, 2026
IMG-20260728-WA0048(1)

करमाळा तालुक्याला राजकीय इतिहासात पहिल्यांदाच मोठा मान मिळाला आहे. गणेश चिवटे यांची भाजप सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी निवड झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनेक प्रस्थापितांना डावलून एका निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी देऊन भाजपने “पक्षनिष्ठा आणि कार्यकर्त्यांचा सन्मान” ही भूमिका पुन्हा अधोरेखित केली आहे.गणेश चिवटे यांनी बजरंग दलातून आपल्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली. विद्यार्थी दशेपासूनच ते भाजपमध्ये सक्रिय होते. युवकांचे मजबूत संघटन उभारण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. कायम भाजपच्या विचारसरणीवर वाटचाल करत त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत.युवा मोर्चा तालुका अध्यक्ष ,भाजप तालुका अध्यक्ष ,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष,जिल्हा सरचिटणीस व आता भाजप जिल्हाध्यक्ष, असा टप्प्याटप्प्याने त्यांचा यशस्वी संघटनात्मक प्रवास झाला आहे. नगरसेवक व बांधकाम समीती साभापती पदावर देखील त्यांनी काम पाहिले आहे. श्रीराम प्रतिष्ठान च्या माध्यमातून अन्नदान योजना आणि सामुदायिक विवाह सोहळ्याचे भव्य नियोजन केले.  दूध व्यवसायातून स्वतः प्रगती साधत अनेक सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला.  शेतकऱ्यांना दूध उत्पादक बनवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी चिवटे या वीट गटातून विक्रमी मतांनी विजयी झाल्या आहेत.,

संघाचे संस्कार, एकनिष्ठपणा आणि संघटनात्मक बांधणीचा प्रचंड अनुभव यामुळे चिवटे यांच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या माध्यमातून जिल्ह्यात भाजपचा विस्तार अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे. सोलापूर पश्चिम ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदावर त्यांना संधी देण्यात आली आहे. 

गणेश चिवटे यांच्या रूपाने पहिल्यांदाच करमाळा तालुक्याला एखाद्या मोठ्या राजकीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद मिळाले आहे. त्यामुळे संपूर्ण करमाळा तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सहिचे पत्र माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते देऊन हि निवड करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *