July 26, 2026
IMG-20260726-WA0035

करमाळा_चौफेर

पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत, करमाळ्याचे TV 9 मराठीचे पत्रकार शितलकुमार मोटे यांना प्रतिष्ठेचा ‘कारगिल योद्धा विशेष आदर्श पत्रकार पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.आजी-माजी सैनिक कल्याणकारी मंडळ आणि यशकल्याणी सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने करमाळा येथील यश कल्याणी सेवाभवन येथे रविवार 26 जुलै 2026 रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जनहिताच्या, शेतकऱ्यांच्या आणि सामाजिक मुद्द्यांवर सतत जागरूक राहून पत्रकारितेच्या माध्यमातून मोलाचे योगदान दिल्याबद्दल शितलकुमार मोटे यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला.ग्राउंड लेव्हलला जाऊन रिपोर्टिंगचे काम केल्याबद्दल पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्याला, जेष्ठ पत्रकार ह.भ.प. डॉ. बाबुराव हिरडे , स्वामी समर्थ ट्रस्टचे भारत शिंदे , कामगार आयुक्त रवीनाथ भिसळे, – ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले,करमाळा वार्ता चे उमेश पवळ , प्रा. साळुंखे ,बाळकृष्ण लावंड ,आजी-माजी सैनिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते.  या  कार्यक्रमाचे आयोजन श्री. गणेश भाऊ करे पाटील – संस्थापक अध्यक्ष, यश कल्याणी सेवाभावी संस्था आणि अंकुश शिंदे, किरण ढेरे मेजर – अध्यक्ष, आजी-माजी सैनिक कल्याणकारी मंडळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शिंदे व नवले सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. नाईकनवरे मेजर यांनी केले.सैनिकांच्या कल्याणासाठी आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी झटणाऱ्या या दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात याच वेळी , पुणे येथील ऑर्केस्ट्रा म्युझिक क्लबचे संचालक श्री. प्रविणकुमार अवचर यांनाही गायन क्षेत्रातील 33 वर्षांच्या योगदानाबद्दल विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *