करमाळा_चौफेर (केम प्रतिनिधी ) दि. 12 जुलै 2026 रोजी झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील ऑनलाईन अबॅकस स्पर्धेत केम ता करमाळा येथील ‘स्मार्टअस अबॅकस क्लास’ची विद्यार्थिनी कु. रेवती अभिजित तळेकर हिने उल्लेखनीय यश मिळवले आहे. या स्पर्धेत तिने संपूर्ण देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे.
देशभरातून हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या या तीव्र स्पर्धेत रेवतीने आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली. अवघ्या ८ मिनिटांच्या वेळेत १५० पैकी १३५ गणिते अत्यंत अचूकपणे सोडवून तिने परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
या स्पर्धेचा भव्य पारितोषिक वितरण सोहळा रविवार, दि. 19 जुलै 2026 रोजी सातारा येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्यात ‘स्मार्टस एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड’चे संस्थापक डॉ. नरेंद्र शेलार सर आणि स्मिता शेलार मॅडम यांच्या शुभहस्ते रेवतीला राष्ट्रीय स्तरावरील ट्रॉफी व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
●मार्गदर्शक आणि पालकांचा वाटा●
रेवतीच्या या यशात ‘स्मार्टअस अबॅकस क्लास – केम सेंटर’च्या संस्थापिका सोनल गौरव कुलकर्णी मॅडम यांचे योग्य मार्गदर्शन, प्रियंका निलेश ओहोळ मॅडम यांचे सहकार्य आणि पालकांचे प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले.
रेवतीच्या या दैदिप्यमान यशामुळे केम शहराचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले आहे. तिच्या यशाबद्दल परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत असून सर्व स्तरातून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा मिळत आहेत.
