करमाळा_चौफेर (शंभू फरतडे ✍🏻)
MHT-CET 2026 च्या निकालात करमाळा शहरातील ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी झळाळती कामगिरी करत संस्थेचा नावलौकिक वाढवला आहे. प्रा. डॉ. महेश निकत सरांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग/फार्मसी प्रवेशासाठीच्या या राज्यस्तरीय परीक्षेत उल्लेखनीय पर्सेंटाईल मिळवले आहेत.
संस्थेचा टॉप स्कोअर ठरलेल्या अथर्व सपकाळ याने 97.09 टक्के मिळवत प्रथम क्रमांक पटकवला. त्याच्यासह तब्बल 12 विद्यार्थ्यांनी 90+ चा टप पा केला, तर 25 विद्यार्थी 75+ गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.
ग्लोबल सायन्सचे टॉपर्स👇🏻
-अथर्व सपकाळ 97.09%
– निखिल माने: 95.97%
– ओम गोडगे: 95.76%
– निकिता पवार: 95.21%
– अंकिता मारकड: 94.84%
– आयुष मोटे: 94.39%
– सानिका बदे: 94.19%
– प्रणव गोडगे: 92.90%
– आयान फकीर: 92.16%
– शिवम जाधव: 90.97%
– पायल राऊत: 90.69%
– वैष्णवी दुधे: 90.30%
याशिवाय हरीकेश गोडगे 89.88, यश लांडगे 87.59, रणवीर काकडे 85.34, प्रतीक कामटे 83.45, सानिका शहा 82.97, वैभवी धोत्रे 81.92, अजिंक्या शिंदे 81.36, मानसी सितापुरे 81.36, उदय गलांडे 81.25, क्षितिज दरणे 78.63, हिंदवी पवार 77.88, प्रशमेश जगदाळे 76.17 आणि समीक्षा काटरिया 75% गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.
या यशाबद्दल सर्व विद्यार्थी, पालक आणि मार्गदर्शक शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे. “विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांचे कठोर परिश्रम, नियमित सराव, गुणवत्तापूर्ण अध्यापन आणि तज्ज्ञ मार्गदर्शन यांचा मोठा वाटा आहे”, असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश निकत म्हणाले.
“ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहराच्या दर्जाचे शिक्षण आणि CET-JEE सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, हेच ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे ध्येय आहे. भविष्यातही आम्ही अधिक गुणवंत विद्यार्थी घडवून करमाळ्याचे नाव राज्यात उजळ करू”, असा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
