June 24, 2026
IMG-20260624-WA0034

करमाळा_चौफेर (   शंभू फरतडे✍🏻)

तालुक्यातील२०० कोटींच्या केम-कन्हेरगाव रस्त्याच्या श्रेयवादावरून सुरू असलेल्या राजकीय चिखलफेकी दरम्यान, पाटील गटाने पत्रकार परिषद घेत थेट पुराव्यांसह आपला दावा मांडला. याच पत्रकार परिषदेत प्रवक्ते सुनील तळेकर यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या टीकेला उत्तर देताना संयमाची भूमिका घेतली.“माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्याबद्दल मला वैयक्तिक आदर आहे. आमदार नारायण आबा पाटील देखील माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा नेहमी राजकीय गुरू म्हणून उल्लेख करतात. मात्र राजकारण काहीही असले, तरी जगताप यांनी स्व. गोविंद बापूंवर टीका करू नये”, अशी भूमिका तळेकर यांनी मांडली.केम-कन्हेरगाव रस्त्यासाठी २०० कोटी मंजूर झाल्यानंतर भाजप नेत्या रश्मी बागल यांनीही पाठपुरावा केल्याचा दावा केल्याने पाटील गट आक्रमक झाला. या पत्रकार परिषदेत पाटील गटाने संबंधित विभागाशी केलेला पत्रव्यवहार तसेच आमदार नारायण पाटील यांना आलेली पत्रे सादर करून पुरावे दिले. “बागल यांनी आमदारांच्या कामाचे श्रेय घेऊ नये. आपल्याकडे पुरावे असतील तर त्यांनी सादर करावेत”, असे आव्हान तळेकर यांनी बागल गटाला दिले.यावेळी पाटील गटाचे युवा नेते व जेऊरचे सरपंच पृथ्वीराज भैय्या पाटील, मार्गदर्शक प्रा. अर्जुन सरक सर , जिल्हा परिषद सदस्य अजित तळेकर, पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब बिचितकर आणि आदिनाथचे संचालक विजय नवले उपस्थित होते.पत्रकार परिषदेत ‘चौफेरच्या ‘प्रतिनिधींनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी तळेकर, आमदार नारायण पाटील आणि स्व. गोविंद बापू पाटील यांच्यावर केलेल्या टीकेबाबत तसेच आदिनाथ कारखाना विक्रीत १५ कोटींचा व्यवहार ठरल्याच्या आरोपाबत प्रश्न विचारला,यावर तळेकर म्हणाले, “स्व. गोविंदबापूंनी आदिनाथसाठी अपार कष्ट घेतले आहेत. आम्ही कोणत्याही परिस्थितीत कारखान्याचे खाजगीकरण होऊ देणार नाही. आमदार नारायण पाटील यांच्यावर आजतागायत १ रुपयाचा देखील भ्रष्टाचाराचा आरोप नाही. जनतेने आबांना सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, सभापती, दोन वेळा आमदार आणि आता संपूर्ण आदिनाथची सत्ता दिली आहे. त्यामुळेच वैफल्यातून आबांवर टीका होत आहे. आम्ही कामातूनच उत्तर देऊ,असे सांगतीले.

नरमाईमागे २०२९ चे गणित?●

एरव्ही शिंदे आणि बागल गटावर आक्रमक टीका करणाऱ्या तळेकरांनी जगतापांच्या प्रखर टीकेनंतरही नरमाईची भूमिका घेतल्याने तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. “गुरु-शिष्य” समीकरण असलेल्या जगताप-पाटील युतीसाठी २०२९ च्या निवडणुकीच्या दृष्टीने हे संयमी धोरण आहे का, अशी कुजबुज सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *