June 18, 2026
IMG-20260618-WA0029

करमाळा_चौफेर

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास तथा पालकमंत्री मा. ना. जयकुमार गोरेसाहेब यांनी करमाळा मतदार संघातील विविध रस्त्यांच्या दुरुस्ती, डांबरीकरण इत्यादी कामांसाठी ग्रामविकास खात्याकडून गट ब अंतर्गत ८ कोटी ५० लाख रुपयांचा भरघोस निधी मंजूर केला असुन या सर्व रस्त्यांच्या कामाची निविदा (टेंडर) प्रसिध्द् झाली असुन लवकरच या कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती भाजपा युवा नेते, मकाईचे माजी चेअरमन मा. दिग्विजय बागल यांनी आज येथे दिली.याबाबत अधिक माहिती देतांना श्री. बागल म्हणाले की, जिल्हा परिषद गटनेत्या रश्मी बागल यांनी राज्याचे ग्रामविकास तथा पालकमंत्री मा.ना. जयकुमार गोरेसाहेब यांना करमाळा करमाळा तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्ती, डांबरीकरण, मजबुतीकरण इत्यादी कामांसाठी शिफारस पत्र दिले होते. या पत्राची तातडीने दखल घेवुन रस्त्यांच्या कामासाठी ८ कोटी ५० लाख एवढा निधी मंजुर केला असुन या सर्व कामांच्या निविदा निघालेल्या असुन लवकरच या कामांना प्रारंभ होणार असुन त्यामुळे तालुक्यातील दळण-वळण व वहातूक व्यवस्था मजबुत होवुन नागरीकांच्या रस्त्यांच्या अडचणी दुर होण्यास मदत होईल.

देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीससाहेब व पालकमंत्री मा.ना. जयकुमार गोरेसाहेब यांच्या सहकार्याने व गटनेत्या रश्मी दिदी बागल यांच्या प्रयत्नातुन भाजपा महायुती सरकारच्या माध्यामातून करमाळा तालुक्यातील विविध विकास कामांची घोडदौड अखंडीतपणे सुरु राहिल असा विश्वास मा. दिग्विजय बागल यांनी यावेळी व्यक्त केला. या भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल पालकमंत्री मा. ना. जयकुमार गोरेसाहेब यांचे विशेष आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *