June 8, 2026
IMG-20260608-WA0000

                   (करमाळा_चौफेर )

आज आमदार नारायण आबा पाटील यांचा महावितरण विरोधात मोर्चा निघणार आहे. मात्र या मोर्चाच्या आधीच कालपासूनच संजयमामा शिंदे गटाकडून सोशल मीडियावर दोन मार्मिक पोस्टर फिरवून आबांवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे. “लोकसेवा कि लोकनाट्य?” आणि “उन्हाळ्यात पिकं वाळली, पावसाळ्यात आंदोलन फुललं” या मथळ्याखाली आबांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.व्हायरल पोस्टर मध्ये म्हटले आहे की “करमाळा आमसभा मध्ये अधिकारी मंडळींना सुनावले तहसीलदारांवर हक्कभंग प्रस्ताव मांडला आरोग्य विभागाचा विषय विधिमंडळात मांडला असे अनेक मुद्दे उपस्थित केले. एवढं करूनही प्रश्न जशेच्या तसेच… बघू आता महावितरणच्या विरोधात मोर्चाच काढतो. असं काहीतरी केलं तर तेवढीच लोकांमध्ये आपली इमेज सुधारते . हा संवाद टाकून आंदोलने ही फक्त ‘इमेज बिल्डिंग’साठी असल्याचा थेट आरोप केला आहेबाकी विकास कामांच्या नावानं ठणाणा सुरूच आहे. रोडकिंग अन पाणीदार सगळंच हवेत विरून गेलंय असे म्हणत रस्ते व पाणी योजनांवर बोट ठेवले.आहेदुसर्‍या पोस्टरवर असे भासवले आहे की मार्च एप्रिल मे महिन्यात वीज टंचाई असताना गप्प होते, व आता जून महिन्यात. पावसात छत्री घेऊन आंदोलन करताना दाखवले आहेत.उन्हाळ्यात पिकं वाळली, पावसाळ्यात आंदोलन पेटलं असा खोचक शेरा मारून आंदोलनाची वेळ चुकल्याचा आरोप केला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *