May 22, 2026
IMG-20260522-WA0005

करमाळा_चौफेर

वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (वॉटर) अंतर्गत वॉलमार्ट प्रोराईज-च्या माध्यमातून “Role of FPOs in Building Community and Ecosystem Resilience: An Exchange among NGOs & FPOs” या विषयावर आयोजित दोन दिवसीय एक्सपोजर-संवाद कार्यक्रम नुकताच हॉटेल विश्वजीत, करमाळा येथे संपन्न झाला. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी उत्पादक संस्था (FPOs) अधिक सक्षम, शाश्वत आणि हवामानस्नेही बनविण्यासाठी हा उपक्रम म्हणजे “हैं तैयार हम” असे हवामान बदलास दिलेले एक ठोस आणि सकारात्मक आव्हान असल्याचे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले.या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्याचे कृषी अधीक्षक श्री. शुक्राचार्य भोसले अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तसेच वॉटर संस्थेचे चे डायरेक्टर संदीप जाधव,हरीश डावरे, संपदा ट्रस्ट चे डायरेक्टर अनिरुद्ध मिरीकर,रिजनल मॅनेजर अभीजीत कवठेकर, प्रकल्प अधिकारी कांतीलाल गीते यांच्यासह वॉटर संस्थेचे वरिष्ठ अधिकारी, विविध सीबीबीओ NGOs, FPOs, FPC प्रतिनिधी, संचालक,आणि प्रकल्प समन्वयक मोठ्या संख्येने सहभागी झाले. कृषी, हवामान बदल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी अशा संवादात्मक उपक्रमांचे महत्त्व यावेळी मान्यवरांनी अधोरेखित केले.या एक्सपोजर-संवाद कार्यक्रमा मध्ये अफार्म, बायफ, टेक्नोसर्व्ह, ईसाफ, नॅशनल ॲग्रो फाउंडेशन, मराठवाडा नवनिर्माण लोकायत (मानवलोक),कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशन, स्विच ऑन फाउंडेशन, व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन (VSTF), कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण, मानव ग्रामीण विकास व संवर्धन संस्था, लोकसाथी प्रतिष्ठान,राष्ट्रविकास ऍग्रो फाऊंडेशन संस्था, संस्कृती संवर्धन मंडळ, युनायटेड वे ऑफ मुंबई,नामांकित संस्थाचे प्रतिंनिधी तसेच त्यांनी उभ्या केलेल्या FPO/FPC चे डायरेक्टर यांनी सहभाग नोंदवला. विविध संस्थांमधील अनुभव, यशस्वी मॉडेल्स,आव्हाने, बाजारपेठीय धोरणे आणि स्थानिक स्तरावर राबविण्यात आलेले नवोपक्रम यांची देवाणघेवाण हा कार्यक्रमाचा केंद्रबिंदू ठरला.

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी सहभागी प्रतिनिधींना विविध यशस्वी FPCs/FPOs ला प्रत्यक्ष भेट देण्याची संधी मिळाली. त्यामध्ये राजे रावरंभा शेतकरी उत्पादक कंपनी करमाळा, श्रीभगवंत महिला शेतकरी उत्पादक कंपनी बार्शी, श्री योगिराणा शेतकरी उत्पादक कंपनी परांडा, आणि जलप्रिया शेतकरी उत्पादक कंपनी भूम या संस्थांच्या भेटीदरम्यान व्यवसाय मॉडेल, मूल्यसाखळी, शाश्वत शेती, बाजारपेठीय रचना, उत्पादन व्यवस्थापन आणि वॉलमार्ट प्रोराईज अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा सखोल अभ्यास करण्यात आला. एफपीओ संचालक, सीईओ,अध्यक्ष आणि शेतकरी सदस्यांशी थेट संवादातून अनेक यशस्वी प्रयोग, स्थानिक आव्हाने आणि त्यावरचे व्यावहारिक उपाय समोर आले.दुसऱ्या दिवशी विविध गटांनी पहिल्या दिवसातील निरीक्षणे आणि शिकवण मांडली. शेतकऱ्यांचे लवचिक उत्पन्न, हवामान बदल, शाश्वत कृषी पद्धती, बाजारपेठेशी जोडणी, लिंग समानता आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांमधील (FPC)प्रशासन या विषयांवर सखोल चर्चा व विचारमंथन झाले. वाढते उत्पादन खर्च, पाण्याचे संकट, बदलती पर्जन्यमान पद्धती, बाजारातील अस्थिरता आणि हवामानातील अनिश्चितता या पार्श्वभूमीवर FPOs हे शेतकऱ्यांसाठी फक्त विक्रीचे माध्यम नसून सामूहिक ताकद, आर्थिक स्थैर्य आणि हवामान बदलाशी जुळवून घेण्याचे सक्षम साधन असल्याचे स्पष्टपणे समोर आले. वॉटर संस्थेच्या नेतृत्वाने एफपीओ अधिक सक्षम, स्वावलंबी आणि भविष्याभिमुख करण्यासाठी अशा एक्सपोजर-संवाद कार्यक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली.या कार्यक्रमाचा सर्वात महत्त्वाचा संदेश असा होता की, बदलते हवामान, वाढती कृषी आव्हाने आणि आर्थिक अस्थिरता यांसमोर एफपीओ ही केवळ उत्पादन विक्री संस्था नसून ग्रामीण समुदाय, शेतकरी उत्पन्न आणि स्थानिक पर्यावरणीय लवचिकतेसाठी प्रभावी आधारस्तंभ ठरू शकतात. विविध संस्थांमधील नेटवर्किंग, अनुभवांची देवाणघेवाण आणि सामूहिक शिकवण यामुळे भविष्यात अधिक सक्षम, शाश्वत आणि आत्मनिर्भर एफपीओ व्यवस्थेचा पाया मजबूत होणार आहे.कृषी व ग्रामीण विकासाच्या दृष्टीने करमाळ्यातील हा एक्सपोजर-संवाद कार्यक्रम बदलत्या हवामानाला दिलेले एक ठाम उत्तर आणि एफपीओ सक्षमीकरणाचा दिशादर्शक टप्पा ठरल्याची भावना सहभागींतून व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *