करमाळा_चौफेर
करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सरपडोह येथे 1 मे महाराष्ट्र दिन ,कामगार दिन व शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थी मेळावा ,शालेय स्टेज उदघाटन व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण व आनंददायी वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी शाळेचे पहिले विद्यार्थी श्री.वसंत बंडू रंदवे ( वय ८१ वर्षे) शाळेच्या पहिल्या विद्यार्थीनी सुमन जयवंतराव घोगरे निंबाळकर ( वय ७७ वर्षे ) सरपडोह गावच्या सरपंच सौ.मालनताई पांडुरंग वाळके यांची खास उपस्थिती होती
कार्यक्रमास मा.मनोज राऊत साहेब (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर) तसेच मा.गणेश करे पाटील साहेब (अध्यक्ष, यश कल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.यावेळी मा.श्री.मनोज राऊत साहेब व मा. श्री.गणेश करे पाटील व शाळेचे मुख्याध्यापक श्री.श्रीकृष्ण मारुती अडसूळ यांच्या हस्ते शालेय स्टेजचे उदघाटन करण्यात आले .
विविध विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन श्री.लक्ष्मण मारुती खराडे व प्रगतशील बागायतदार श्री.अशोक जयवंतराव घोगरे यांनी 1लाख 25 हजार रुपयांचे अतिशय उत्कृष्ट स्टेज शाळेस उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांना सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री मनोज राऊत साहेब यांनी मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थी अभ्यासिका तयार करण्यासाठी मदत करण्याचे जाहीर केले तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री गणेश करे पाटील यांनी संघर्ष माणसाला यश मिळवून देत असतो असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले व अभ्यासिकेसाठी 11000 रुपये किंमतीची पुस्तके देण्याचे जाहीर केले,तर राज्य विक्रीकर अधिकारी सुधीर अडसूळ साहेब यांनी स्पर्धा परिक्षे बाबत मार्गदर्शन केले व 5000 रुपये किमतीची पुस्तके देण्याचे जाहीर केले.सदर प्रसंगी शाळेचा माजी विद्यार्थी यशराज अरुण चौगुले याची सातारा सैनिक स्कुल मध्ये निवड झाल्यबद्दल व शाळेतील विविध स्पर्धेत यश संपदान केल्याबद्दल साक्षी तानाजी खराडे ,शिवानी प्रदीप भंडारे समृद्धी अशोक गवारे समीक्षा तानाजी मोटे व विशंभू बाबुराव पवार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने सर्वांसाठी माजी विद्यार्थी संघाच्या वतीने स्नेहभोजन देण्यात आले .सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य, गीत, नाट्यप्रयोग आदी आकर्षक सांस्कृतिक सादरीकरणे करून उपस्थितांची मने जिंकली.याच कार्यक्रमात अंगणवाडीच्या चिमुकल्यानी पण नृत्ये सादर केली. गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणाचे कौतुक करत बक्षीसांचा वर्षाव केला.कार्यक्रमास विविध शासकीय ,सामाजिक, शैक्षणिक ,औद्योगिक राजकीय क्षेत्रात काम करणारे शाळेचे अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते.तसेच साडे केंद्राचे केंद्र प्रमुख श्री वसंत बदर साहेब,यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे श्री राख सर श्री.काळदाते सर ,श्री शिंदे सर श्री. थोरवे सर,घोटी येथील श्री.दुधे सर यांची उपस्थिती होती
शाळेसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या मान्यवरांचा व ग्रामस्थांचा सत्कार करण्यात आला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री.दत्तात्रय लक्ष्मण खराडे माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष श्री.बाळासाहेब गोरख भिताडे शेठ , माजी विद्यार्थी संघाचे खजिनदार श्री शरद अशोक घोगरे ,शाळा व्यस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.बाळासाहेब महाडीक, उपाध्यक्ष श्री नितिन येळे सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्री गणेश घोगरे ,श्री अरुण चौगुले सर व सर्पनाथ सेवा मंडळ पुणे ग्रुप व माजी विद्यार्थी यांनी योगदान दिले.
सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री शिवाजी लोकरे सर, श्रीमती अनुपमा वणवे मॅडम, श्रीम.वनिता बडे मॅडम श्रीम वंदना कुलकर्णी मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.त्याबद्दल त्यांचा सन्मान शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौ रेश्मा खराडे व ज्योती पवार यांच्या हस्ते करण्यात आला.शाळेतील शिक्षिका व शाळेची माजी विद्यर्थिनी ऐश्वर्या आरणे यांनी सुरेख रांगोळी काढली होती.कार्यक्रमास सर्व पालकांचे सहकार्य लाभले.माजी विदयार्थी मेळावा व शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शाळेच्या भौतिक विकास व इतर शालेय कामकाजाकरिता माजी विद्यार्थी व ग्रामस्थांकडून 70000 रुपये तर यात्रा वर्गणीतून 25000 रुपये व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी 40415 रुपये बक्षिस असे एकूण 1लाख 35 हजार 415 रुपायांचा निधी जमा झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री.श्रीकृष्ण अडसूळ सर यांनी केले तर प्रभावी सूत्रसंचालन श्री दादासाहेब माळी सर यांनी केले व आभार प्रदर्शन गावचे उपसरपंच तथा माजी विद्यार्थी संघाचे सदस्य श्री.नाथाराव रंदवे सर यांनी केले.
