करमाळा_चौफेर
इयत्ता 12 वी बोर्ड परीक्षेत महात्मा गांधी ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, करमाळा ने 99.35% निकाल लावत घवघवीत यश संपादन केले आहे. या वर्षी 308 विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यापैकी 306 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
कुमारी मंगल गोपीनाथ कोंडलकर हिने गणित विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. यामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

●महाविद्यालयातील यश संपादन केलेले विद्यार्थी व टक्केवारी●
कुमारी हर्षदा हनुमंत जमदाडे 87.33 गुणांसह (प्रथम क्रमांक)
कुमारी वैभवी उमेश पवार 83.00% गुणांसह (द्वितीय क्रमांक)
कुमारी प्रणिती पोपट मोहोळकर 83.00% गुणांसह (द्वितीय क्रमांक)
कुमारी स्नेहल भाऊसाहेब शिंदे 82.33% गुणांसह (तृतीय क्रमांक)
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. जयवंतराव जगताप विश्वस्त माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप विश्वस्त माजी उपनगराध्यक्ष नारायणबापू जगताप, विश्वस्त युवा नेते शंभूराजे जगताप, तसेच प्राचार्य बी. के. पाटील, उपप्राचार्य अनिस बागवान, पर्यवेक्षक एम. आर. कांबळे, पर्यवेक्षिका सौ. सुनिता नवले, विज्ञान शाखा विभाग प्रमुख व्ही. एल. पवार व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे

