करमाळा_चौफेर (शंभू फरतडे ✍️)
कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कामगार नेते, हमाल पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष, जि.प. माजी सदस्य व श्री आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक स्व. सुभाष (आण्णा) सावंत यांच्या 75 व्या जयंतीनिमित्त करमाळ्यात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक 1 मे 2026, शुक्रवार रोजी हमाल भवन, मार्केट यार्ड, पोथरे नाका, करमाळा येथे सकाळी 9.00 वाजता स्व. सुभाष (आण्णा) सावंत यांना अभिवादन व पुष्पांजली अर्पण सोहळा होईल.
यानंतर सकाळी 9 ते दुपारी 3या वेळेत मोफत आरोग्य शिबीर होणार असून यामध्ये शुगर, बीपी, ईसीजी, औषधे, डोळे तपासणी व चष्मा वाटप इत्यादी तपासणी मोफत केली जाणार आहे. तसेच गोशाळेत चारा वाटप व रुग्णांना फळे वाटप कार्यक्रमही होणार आहे.
हमाल पंचायत करमाळा व स्व. सुभाष (आण्णा) सावंत जयंती समितीच्या वतीने सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


