करमाळा_चौफेर
करमाळा तालुक्यातील सहकारी संस्था आणि प्रकल्प मोडकळीस यावेत अशी विखारी मानसिकता बाळगून माजी आमदार संजयमामा शिंदे राजकारण करत आहेत, असा सनसनाटी आरोप आमदार नारायण आबा पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केला आहे.

आदिनाथ कारखान्याच्या लिलावाच्या नोटीसीनंतर शिंदे गटाने सोशल मीडियावर ‘आमचे भाकीत खरे ठरले’ असा प्रचार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर देताना तळेकर म्हणाले की, आदिनाथ च्या लिलावा बाबत यापूर्वीही शिंदेंनी ढोल बडवला होता, पण लिलाव झाला नव्हता. “क्षणिक समाधानासाठी ढोल बडवण्याने जनतेवर परिणाम होणार नाही,” असा टोला त्यांनी लगावला.

या बरोबरच तळेकर यांनी रिटेवाडी,उजनी, दहिगाव योजने वरून देखील माजी आमदार शिंदे यांच्यावर आरोप केले असून तळेकर यांच्या म्हणण्यानुसार ‘आमदार पाटील यांच्या संकल्पनेतील रिटेवाडी उपसा सिंचन योजनेचे नाव बदलून शिंदेंनी तो प्रस्ताव पाच वर्षे हाणून पाडला’, लाकडी निंबोडी योजनेअंतर्गत उजनीचे पाणी इंदापूरला देण्यास संमती दिली, दहिगाव योजनेचा वापर केवळ स्वतःच्या ‘कमलाई’ कारखान्यासाठी केला आणि जातेगाव-टेंभुर्णी रस्ता केंद्राकडे देऊन त्याचे काम रखडवले. त्यामूळे शिंदेंची दृष्टी करमाळ्याला विकासापासून वंचित ठेवणारी आहे, असे देखील तळेकर यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर आदिनाथबद्दल बोलण्याआधी माजी आमदारांनी म्हैसगावचा ‘श्री विठ्ठल शुगर’ का विकला, याचे उत्तर द्यावे, जनतेला द्यावे” असे आव्हानही तळेकर यांनी माजी आमदार शिंदे यांना दिले आहे.




