March 23, 2026
IMG-20260323-WA0035

 

करमाळा_चौफेर

करमाळा येथील भूमी अभिलेख कार्यालयाचा  वीज पुरवठा केवळ १५४०० रुपयांच्या थकीत बिलामुळे खंडित करण्यात आला आहे. यामुळे कार्यालयाचा संपूर्ण कारभार विस्कळीत झाला असून, कर्मचारी चक्क मोबाईलची टॉर्च लावून शासकीय दप्तर वाचत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. या कार्यालयातून शेती मोजणी, नकाशे दुरुस्ती आणि जुने उतारे काढणे अशी महत्त्वाची कामे चालतात, जी आता पूर्णपणे ठप्प झाली आहेत.

आधीच या कार्यालयात शेतकरी आणि नागरिकांची मोजणीची अनेक प्रकरणे प्रलंबित असताना, आता वीज नसल्याने कामाचा डोंगर अधिकच वाढणार आहे. दररोज शेकडो नागरिक आपल्या कामासाठी येथे गर्दी करतात, मात्र वीज गुल झाल्याने प्रशासनाची मोठी नाचक्की झाली आहे. सरकारी कार्यालयाचे वीजबिल वेळेवर न भरल्यामुळे सर्वसामान्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे

या प्रकरणावर वरिष्ठ अधिकारी काही तातडीने पावले उचलणार का किंवा पर्यायी व्यवस्था केली जाईल का हे पहाणे महत्वाचे आहे.आगोदरच भोंगळ कारभारासाठी लौकिक असलेल्या भुमीअभिलेख कार्यालयाचा कारभार किती दिवस आंधारातच चालणार याची चर्चा सुरू होती.

१५४०० रू थकबाकी असून ११ हजार रुपयांचा चेक दिला तरी वीज कट केली असल्याचे अधिकाऱ्यांकडून एका वृत्त वाहिनीला सांगतीले आहे. उपस्थित असलेल्या नागरिकांकडून या बाबत तीव्र संताप व्यक्त केला गेला आहे कार्यालयाकडून देखील वेळेत वीज भरले पाहिजे मात्र लोकांच्या अडचणी होवू नये म्हणून महावितरण कडून अशा महत्त्वाच्या कार्यालयास थोडी सवलत देणे गरजचे असल्याचे देखील लोकांचे मत होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *