March 12, 2026
cropped-Untitled-design-1.jpg

सर्वसामान्यांच्या हुंकारासाठी ‘करमाळा चौफेर’ सज्ज

 

        जच्या काळात वृत्तपत्रे आणि चॅनल्सचा सुळसुळाट असतानाही, सामान्य माणसाचा आवाज मात्र आजही दबलेलाच दिसतो. पोलीस ठाणे असो, महसूल विभाग किंवा शासकीय रुग्णालय, प्रत्येक ठिकाणी गोरगरिबांची होणारी हेळसांड आणि अडवणूक आता नित्याचीच झाली आहे. कधी प्रशासकीय अनास्था तर कधी सत्तेची दडपशाही यामुळे सामान्य जनतेचा न्याय हक्काचा आवाज दाबला जात आहे.याचा अर्थ सर्वच ठिकाणी प्रशासन किंवा अधिकारी चुकीचे असतिलच असे आमचे मत नाही मात्र प्रशासनातील काही जण वरिष्ठांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचे काम करतात , त्यामुळे सहज सुटणारे प्रश्न देखील गुतंतागुतीचे बनतात व थेट आत्मदहन, धरणे आंदोलन, उपोषण या शिवाय सर्व सामान्यांपुढे पर्याय रहात नाही व हे करून देखील माध्यमांची कणखर साथ नाही भेटली तर हि आंदोलनं देखील दडपली जातात.

 

 

राजकीय ,प्रशासकीय दडपशाहीमुळे सामन्यांचे शब्द ओठांवरच गोठतात, तेव्हा त्या दबलेल्या आवाजाला मोकळी वाट करून देण्यासाठी आम्ही पुन्हा येत आहोत. ‘करमाळा चौफेर’ हे केवळ न्युज पोर्टल नसून, तो अन्यायाविरुद्ध लढणारा एक सक्षम पर्याय ठरवा या साठी आम्ही प्रयत्नशील रहाणार आहोत. व त्यासाठीच समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून तुमचे हक्काचे व्यासपीठ बनून सज्ज झालो आहोत.

 

   करमाळा तालुक्यातील सच्चा पत्रकारांच्या बरोबरीने आम्ही साप्ताहिका बरोबरच पुन्हा एकदा ऑनलाईन न्युज पोर्टल च्या माध्यमातून सर्व सामन्यांच्या लढाई लढण्यासाठी सज्ज आहोत. तुमचा विश्वास आणि आमची लेखणी, आता अन्यायाचा पर्दाफाश करेल! हा ठाम विश्वास मनात ठेवून आपण वाटचाल करणार आहोत. आपल्या सहकार्याची अपेक्षा!

 

धन्यवाद

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *