April 24, 2026
IMG-20260423-WA0052

करमाळा_चौफेर

देशभक्त कै. नामदेवरावजी जगताप प्रतिष्ठानच्या वतीने कॉंग्रेस (आय) कमिटी करमाळा तालुकाध्यक्ष मा. श्री. प्रतापराव नामदेवरावजी जगताप यांच्या २३ एप्रिल २०२६ रोजी साजरा होणाऱ्या वाढदिवसानिमित्त “निशुल्क देव दर्शन यात्रा २०२६” चे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा फक्त महिलांसाठी असणार आहे.

उद्या दिनांक २४ एप्रिल रोजी पहाटे 3 वाजता करमाळा येथून प्रस्थान होणार आहे. नामरत्न कॉम्प्लेक्स, मेन रोड, करमाळा ठिकाणाहून चार एस टी बस असंख्य गाड्यांचा ताफा घेऊन. हि यात्रा सुरू होणार आहे. करमाळा – गाणगापूर – अक्कलकोट – तुळजापूर – यरमाळा – करमाळा असा या यात्रेचा प्रवास असणार आहे. वाढदिवसानिमित्त महिलांसाठी मोफत ५ तीर्थक्षेत्रांची यात्रा काढणे हा कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षांचा मतदारसंघातील महिलांशी थेट जनसंपर्क साधण्याचा उपक्रम आहे. गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर ही राज्यातील प्रसिद्ध देवस्थाने असून यरमाळा व करमाळा येथील स्थानिक मंदिरांचाही समावेश केल्याने तालुक्यातील महिलांना याचा लाभ होणार आहे. प्रतापराव जगताप हे जेष्ठ नेते देशभक्त स्व नामदेवरावजी जगताप यांचे चिरंजीव असून ज्येष्ठ बंधू चिंतामणी दादा जगताप यांच्या मार्गदर्शनातून सातत्याने सामाजिक उपक्रम राबवण्यावर भर देतात. त्यांना बंधू माजी नगरसेवक राहुल भैय्या जगताप यांची मोलाची साथ मिळते. जगताप बंधूंच्या सामाजिक बांधिलकीचा हा आणखी एक नमुना आहे.या पुर्वी जगताप बंधुंनी मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबीर मोफत आरोग्य तपासणी शिबीर,अल्प दरात गोळ्या-औषध उपलब्ध करून देणे असे अनेक उपक्रम राबवले आहेत हाच सामाजिक उपक्रमाचा वसा पुढे नेहताना महिलांसाठी तीर्थयात्रा आयोजित करून जगताप कुटुंबाने सामाजिक बांधीलकी जपली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *