करमाळा_चौफेर (शंभू फरतडे)
आमदार नारायण पाटील यांच्या निष्क्रियेतवर टिका करणार्या विरोधकांना आमदार पाटील यांनी कृतीतून उत्तर दिले असून केम रोपळे व कन्हेरगाव या २५ किलोमीटर रस्त्यासांठी तब्बल २०० कोटींची भरीव निधी उपलब्ध केला असून करमाळा तालुक्यातील केम जिल्हा परिषद गटातील नागरिकांना निवडणूक प्रचारादरम्यान दिलेला शब्द आमदार नारायण पाटील यांनी पाळला असल्याची चर्चा होत आहे.
खड्ड्यांमुळे दळणवळणासाठी नागरिकांची मरणयातना आता कायमस्वरूपी संपवणार आहे. ADB योजनेतून हा निधी मंजूर करून आणण्यात नारायण पाटील यांना यश आले आहे. प्रजिमा-१२ क्रमांकाचा हा रस्ता किमी ०/०० ते २५/०० तब्बल २५ किमी लांबीचा आहे. गेली पाच वर्षे हा रस्ता पूर्णपणे उखडल्याने विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, शेतकरी, महिला आणि नोकरदार वर्गाला रोजच नरकयातना सहन कराव्या लागत होत्या. पावसाळ्यात तर रुग्णवाहिकाही आत जाऊ शकत नव्हती.
याबत बोलताना आमदार नारायण पाटील म्हणाले, “आमदारपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर करमाळा मतदारसंघातील दळणवळण सुविधा बळकट करणे हे माझे प्राधान्य होते. जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक प्रचारात केम गटातील मायबाप जनतेने या रस्त्याची आर्त हाक दिली होती. तेव्हाच मी त्यांना शब्द दिला होता की हा रस्ता १००% करून दाखवेन.”त्यानुसार “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे मी सातत्याने पाठपुरावा केला होता.
जिल्हापरिषद सदस्य प्रतिनीधी अजित तळेकर यांनी आमदार नारायण पाटील यांचे आभार मानले असून हजारो लोकांचा प्रश्न सुटला असल्याचे सांगीतले माजी सभापती शेखर गाडे यांनी देखील आमदार नारायण पाटील यांच्या कामाचे कौतुक केले आहे .ADB योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील रस्ते राष्ट्रीय-राज्य महामार्गांना जोडून हवामानाला तोंड देऊ शकणारे, शाश्वत आणि दर्जेदार रस्ते बांधले जातात या योजनेंतर्गत हा रस्ता होणार आहे. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल, असेही त्यांनी सांगतीले.
निवडणुकीत दिलेला शब्द कृतीतून पूर्ण केल्याने केम, कंदर, रोपळे, कन्हेरगावसह परिसरातील ग्रामस्थांनी आमदार नारायण आबा पाटील यांच्या या “मास्टरस्ट्रोक”चे सर्वत्र कौतुक केले जात आहे. “बोलले तसे केले” या भूमिकेमुळे करमाळा मतदारसंघात आबांच्या कार्यपद्धतीवर समाधान व्यक्त होत आहे.
