October 12, 2026
IMG-20261012-WA0023(1)

करमाळा-चौफेर

भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक विस्तारासाठी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात ‘गाव तिथे भाजपा, बूथ तिथे शाखा’ अभियानाला सुरुवात झाली आहे. जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या हस्ते पांडे येथे दोन, तर धायखिंडी येथे एका भाजपा शाखेचे उद्घाटन करण्यात आले.देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांनी दिली.प्रत्येक गावात पक्षाची सक्रिय शाखा स्थापन करणे, प्रत्येक बूथवर कार्यकर्त्यांचे संघटन मजबूत करणे आणि केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे, हा अभियानाचा प्रमुख उद्देश असल्याचे चिवटे यांनी सांगितले. शाखांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्नशील राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर गणेश चिवटे यांनी मंडळे, शक्ती केंद्रे आणि बूथस्तरावरील संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून गावागावांत शाखा स्थापन करण्याचे अभियान हाती घेण्यात आले असून, आगामी काळात सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यातील प्रत्येक गाव आणि बूथपर्यंत पक्षाचे संघटन मजबूत करण्याचे नियोजन आहे.या वेळी मंडलाध्यक्ष काकासाहेब सरडे, भाजपा नेते प्रतापराव जगताप, नगरसेवक रामभाऊ ढाणे, महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान अफसर जाधव, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, ज्येष्ठ नेते संजय घोरपडे, अमोल पवार, बंडू शिंदे, सोमनाथ घाडगे, हनुमंत रणदिवे, हर्षल शिंगाडे, नितीन निकम, नाना अनारसे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *