August 2, 2026
IMG-20260802-WA0091

             करमाळा_चौफेर शंभू फरतडे

सहकाराचे मंदिर असलेला व उसाच्या कोठारात वसलेला राज्यातील एकमेव आदिनाथ सह साखर कारखाना कोणत्याही परिस्थितीत विकला जाऊ देणार नाही वेळ प्रसंगी कोर्टात जाऊ ,रक्त सांडू पण सभासद कामगार यांच्या घामाचा दाम कोणाच्या घशात जाऊ देणार नाही असा खणखणीत इशारा आमदार तथा आदिनाथ चे चेअरमन नारायण आबा पाटील यांनी जेऊर येथे पत्रकार परिषदेत दिला.आधीक बोलताना नारायण पाटील म्हणाले आदिनाथ ला कर्ज उपलब्ध करून घेण्यासाठी मि अतोनात प्रयत्न केले.
भाडेतत्त्वावर, देण्यास देखील तयार होतो.मात्र या बाबत सहकार्य झाले नसल्याची खंत आमदार नारायण पाटील यांनी बोलून दाखवली.

नव्याने साखर उद्योगात उदयाला आलेले ओंकार शुगर चे बाबूराव बोत्रे पाटलांनी या लिलाव प्रकियेत सहभाग घेऊन ४५० कोटीची मालमत्ता असलेला आदिनाथ १२५ कोटीत विकत घेण्याचा डाव टाकला असल्याचा आरोप करत कोणतीही शक्ती आली तरी विकत घेऊन कारखाना चालवू देणार नाही हे लक्षात ठेवावे असा इशारा नारायण पाटील यांनी दिला आहे.आदिनाथ सह साखर कारखान्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार नारायण पाटील यांची एकहाती सत्ता आहे.आदिनाथ कारखाना सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्याने आमदार नारायण पाटील हे सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या संपर्कात होते.नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत देखील भाजपला पुरक भुमिका घेतली होती.आदिनाथ ला कर्ज उपलब्ध झाल्यावर उस उत्पादक शेतकरी ,कामगार यांची देणी देऊन आदिनाथ सुरू करता येईल या ऐकमेव भावनेने नारायण पाटील यांनी भाजपशी सलगी केली होती ,असे असून कर्ज उपलब्ध का झाले नाही? असे पत्रकार यांनी विचारता आमदार नारायण पाटील म्हणाले ,मुख्यमंत्री पालकमंत्री या बाबत सकारात्मक होते मात्र तालुक्यातील विरोधक नेतेमंडळी मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून नारायण पाटील यांनी आदिनाथ सुरू केला तर आमचे राजकीय भवितव्य धोक्यात आहे अशी गळ घालून मदत मिळवून देण्यास अडथाळा करत होते असा आरोप आमदार नारायण पाटील यांनी केला.आदिनाथ हा एकतर भाडेतत्त्वावर चालवावा किंवा संचालक मंडळास कर्ज उपलब्ध करून द्यावे अशीच आमची आजही मुख्यमंत्री ,पालक मंत्री यांच्याकडे मागणी आहे तालुका पातळीवरील राजकारणा साठी सहकाराचे मंदिर असलेल्या आदिनाथ चा बळी देऊन कामगारांवर अन्याय करू नये अशी भुमिका आमदार नारायण पाटील यांनी मांडली.यावेळी आदिनाथचे व्हाईस चेअरमन महेंद्र पाटील, संचालक देवानंद बागल, डॉ हरीदास केवारे, डॉ अमोल घाडगे, राहुल सावंत, किरण कवडे, विजयसिंह नवले, दत्तात्रय गव्हाणे, दत्ताबापू देशमुख, श्रीमंत चौधरी, रवीकिरण फुके, आबासाहेब अंबारे, हनुमंत सरडे, रामेश्वर तळेकर, महादेव पोरे . संतोष खाटमोडे पाटील आदि उपस्थित होतेयावेळी संचालकांनीही बोत्रे पाटील यांना उघड विरोध करत आमदार नारायण आबा पाटील यांच्या पाठीशी आम्ही एकजुटीने उभे असल्याचे ठामपणे सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *