July 15, 2026
IMG-20260715-WA0024(1)

करमाळा_चौफेर

रमाळा तालुक्यातील पुर्व भागासाठी महत्वाची मागणी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या पावसाळी आवर्तन बाबत तसेच मतदार संघातील वीजेच्या समस्येबाबत आमदार नारायण आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पाटबंधारे व महावितरणच्या अधिकाऱ्याची एक बैठक शनिवार दिनांक १८ जूलै रोजी दुपारी १२ वाजता जेऊर येथील आमदार कार्यालयात आयोजित केली असल्याची माहिती आमदार नारायण आबा पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी दिली आहे.करमाळा तालुक्यातील पुर्व भागातील सिंचना साठी पावसाळ्यात ओव्हर फ्लोचे आवर्तन देण्यापूर्वी दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या यांत्रिक, इलेक्ट्रिक, स्थापत्य आदि विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाची पुर्व तयारी आढावा घेण्यासाठी ही बैठक घेतली जाणार आहे. आमदार नारायण पाटील यांनी दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करण्याच्या सुचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यामुळे कार्यालयीन स्तरावरील तसेच प्रत्यक्ष जमिनस्तरावर असलेल्या समस्या दुर करुन आवर्तनास अडथळा आला नाही पाहिजे यासाठी नियोजन सुरू झाले आहेशनिवार रोजी जेऊर येथील बैठकीत अंतिम निर्णय आमदार नारायण आबा पाटील हे घेणार असल्याचे तळेकर सांगितले आहे.तसेच महावितरण विभागाच्या करमाळा व जेऊर विभागाचे अधिकारी तसेच सर्व शाखा अभियंता आणि वीजेची कामे करणारे ठेकेदार यांची एक बैठक याच दिवशी जेऊर येथे आमदार पाटील यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या बैठकीत सध्या सुरू असलेला वीज पुरवठा, वीजेच्या कामांचा आढावा याबाबत माहिती घेतली जाणार आहे. शनिवार रोजी जेऊर येथे दुपारी आमदार नारायण आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आदिनाथ, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व आजी माजी पदाधिकारी तसेच पाटील गटातील प्रमुख कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये या दोन बैठका होणार असल्याचे पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *