July 2, 2026
IMG-20260702-WA0123

करमाळा_चौफेर  ✍🏻

भारतीय जनता पार्टीने करमाळा तालुक्यात संघटनात्मक बांधणीला वेग देत हिवरे येथील सुपुत्र ह.भ.प. आदिनाथ महाराज लोखंडे यांची भाजप आध्यात्मिक आघाडी तालुका अध्यक्ष (शहर मंडल) पदी निवड केली आहे,हिवरे येथील बाळूमामा मंदिर येथे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजपच्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. यावेळी भाजप तालुका अध्यक्ष काकासाहेब सरडे यांच्यासह बहुसंख्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.आदिनाथ महाराज लोखंडे हे प्रसिद्ध संत सद्गुरू शिवलाल स्वामी महाराज यांचे पट्टशिष्य म्हणून ओळखले जातात. पंढरपूर येथील शिवलाल स्वामी महाराज यांच्या मठाची संपूर्ण जबाबदारीलोखंडे महाराज यांच्या खांद्यावर आहे.वारकरी संप्रदायात त्यांना मानाचे स्थान असून, पंढरपूरसह करमाळा तालुक्यातील आध्यात्मिक परिवारातील लोकांशी त्यांचा जवळचा संबंध आहे. कीर्तन, प्रवचन व सामाजिक कार्यातून त्यांनी मोठा जनसंपर्क निर्माण केला आहे.

लोखंडे महाराज यांचा आध्यात्मिक क्षेत्रातील दांडगा जनसंपर्क व वारकरी संप्रदायातील पकड पाहता त्यांच्या निवडीचा भाजपला थेट फायदा होऊ शकतो. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका व २०२९ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भाग व आध्यात्मिक वर्गाला पक्षाशी जोडण्यासाठी महत्त्वाचा फायदा होवू शकतो.

जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी निवडीचे पत्र देताना अंत्योदय कल्याणाचा विचार घेऊन पक्ष वाढीसाठी व संघटनात्मक बांधणीसाठी जोमाने काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली व ही निवड तत्काळ लागू करण्यात आली आहे.

हिवरे येथील बाळूमामा मंदिरात झालेल्या या बैठकीस जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, तालुका अध्यक्ष काकासाहेब सरडे, शहर मंडल पदाधिकारी व मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. लोखंडे महाराज यांच्या निवडीचे कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *