June 16, 2026
IMG-20260615-WA0064(1)

करमाळा_चौफेर

हिवरे ता करमाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी एकीकडे चिमुकल्यांचे गुलाबपुष्प-गणवेश देऊन उत्साहात स्वागत झाले, तर दुसरीकडे याच शाळेत शिकून PSI झालेल्या अतुल विटुकडे यांचा गावकऱ्यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला ,तसेच विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे  वाटप करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना नवनियुक्त PSI अतुल विटुकडे म्हणाले, “मी देखील याच शाळेच्या बाकावर बसलो, याच मातीत रमलो. मित्रांची गाईड घेऊन अभ्यास केला. मी टॉपर नव्हतो, मात्र जिद्द सोडली नाही. अविरत कष्ट करा. आई-वडिलांच्या स्वप्नांची आणि कष्टांची जाणीव ठेवा. एक दिवस तुमचा देखील सत्कार होईल.” असे मत व्यक्त केले. यावेळी युवासेना तालुकाप्रमुख व शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष शंभूराजे फरतडे म्हणाले, “मराठी शाळा वाचल्या पाहिजेत. यासाठी शिक्षकांनी सेमी इंग्रजीसह विविध प्रयोग केले पाहिजेत, ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला पाहिजे. इथे मोफत दर्जेदार शिक्षण मिळते, हेच लाखो रुपये पुढे उच्च शिक्षणासाठी उपयोगी पडतात.” शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगतीले की या शाळेतील अनेक विद्यार्थी तालुकास्तरावर चमकले आहेत, स्पर्धेत यश मिळवत आहेत, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विविध उपक्रम राबवत आहोत, “निसर्गरम्य वातावरण, मोफत शिक्षण, उपक्रम सगळं असतानाही पालक मुलांना खासगी शाळेत घालतात. पाचवी-सहावीचा पट काही प्रमाणात कमी झाला आहे. पण सातवीतून 17 मुले उत्तीर्ण होऊन पुढे गेली आहेत आणि पहिलीसाठी नवीन 19 मुले-मुलींचा प्रवेश झाला आहे.”हि समाधानकारक बाब असली तरी खासगी शाळेत मुलं पाठवण्याच्या निर्णयावर शिक्षकांनी खंत व्यक्त केली.पट टिकवण्याच्या मुद्यावर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नामदेव जगताप यांनी “पाचवी-सहावीच्या पालकांची, शिक्षकांची व ग्रामस्थांची बैठक घेऊन समजूत काढू” असा प्रस्ताव मांडला.

पहिल्याच दिवशी गावच्या PSI चा आदर्श आणि नवागतांचे स्वागत यामुळे हिवरे शाळेचा पटांगण गजबजून गेला होता.नवनियुक्त पि एस आय अतुल विटुकडे यांनी विद्यार्थ्यांना चिवडा व मोतीचूर लाडवाची पाकिटे वाटून त्यांचा आनंद द्विगुणित केला.

यावेळेस सर्व शिक्षक, पालक बहुसंख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *