करमाळा_चौफेर
करमाळा-जामखेड-साकत-पाटोदा राज्य महामार्ग क्रमांक 56 च्या विकासासाठी राज्य सरकारने 300 कोटी रुपयांचा ऐतिहासिक निधी मंजूर केला आहे. विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी ही माहिती दिली असून, करमाळ्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनीही या महामार्गासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याने या निर्णयाला यश आले आहे.
महाराष्ट्र अमृत काळ रस्ते विकास योजनेच्या पहिल्या टप्प्यात आशियाई विकास बँकेच्या (ADB) अर्थसहाय्यातून हा महत्वपूर्ण प्रकल्प राबवला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात करमाळा ते जामखेड या 40 किमी लांबीच्या जुन्या राज्यमार्गाचे 10 मीटर रुंदीच्या दर्जेदार सिमेंट कॉंक्रिट रस्त्यात रूपांतर होणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून खड्डेमय अवस्थेत असलेल्या या रस्त्यामुळे शालेय विद्यार्थी, दुध व्यावसायिक, शेतकरी व प्रवाशांना मोठी गैरसोय होत होती. आमदार नारायण आबा पाटील यांनी विधानसभेत अनेक वेळा या रस्त्याचा प्रश्न मांडून निधीसाठी आग्रह धरला होता. स्थानिक पातळीवरही त्यांनी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन पत्र व्यवहार करून पाठपुरावा केला होता. विधान परिषद सभापी प्रा. राम शिंदे आ. नारायण पाटील पाटील यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा निधी मंजूर झाला असल्याचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सांगतीले.
●प्रकल्पाची वैशिष्ट्ये●
लांबी 40 किमी, करमाळा ते जामखेड
रुंदी 10 मीटर सिमेंट कॉंक्रिट
निधी: 300 कोटी, ADB अर्थसहाय्य
जामखेड, अहिल्यानगर, सोलापूर, बीड जिल्ह्यांना जोडणारा ‘विकासमार्ग’
जवळा, नानज, भिगवण, झिक्री येथे 14 मोठे सिमेंट रस्ते, 1 मीटर सर्व्हिस रस्ता
या रस्त्यामुळे करमाळा तालुक्यातील शनैशश्वराची पावन भुमि असलेल्या पोथरे, तसेच जवळा, नानज, बोरगाव, झिक्री यासह अनेक गावांना फायदा होणार आहे.
