May 6, 2026
IMG-20260505-WA0049

करमाळा_चौफेर शंभू फरतडे

करमाळा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने गोपनीय बातमी व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे 60,000/- रुपये किंमतीची चोरीस गेलेली मोटार सायकल 24 तासांत हस्तगत करून आरोपीला अटक केली आहे.दि. 26/04/2026 रोजी रात्री 08:00 ते 10:00 वा. च्या दरम्यान फिर्यादी समाधान तुकाराम वाघ, वय 22, रा. वाघाचीवाडी यांनी त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस, MH 42 P 2584 ही काळ्या रंगाची मोटार सायकल लावंड हॉस्पिटलसमोर, करमाळा येथे उभी केली होती. ती अज्ञात इसमाने चोरून नेली म्हणून करमाळा पोलीस ठाणे गु.र.नं. 384/2026 भा.न्या.सं. कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोहेको/1648 अजित उबाळे, पोना/1162 मनिष पवार, पोना/912 वैभव ठेंगल, पोकों/438 रविराज गटकुळ, पोकों/856 अर्जुन गोसावी, पोकों/25 भराटे, पोकों/1524 रंदिल यांनी तपासाची चक्रे फिरवली. गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी विजय सुभाष लोंढे, वय 25, रा. बाळेवाडी, ता. करमाळा याने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेली MH 42 P 2584 ही मोटार सायकल हस्तगत करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेको/1109 बाळसराफ हे करीत आहेत.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रिमत यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अंजना कृष्णा, पोलीस निरीक्षक श्री. रणजीत माने यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *