करमाळा_चौफेर
राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या करमाळा तालुका कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांच्या निवडी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पंढरपूर येथे झालेल्या जिल्हा बैठकीमध्ये करण्यात आल्या. यावेळी माजी मंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्रभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व करमाळा तालुका अध्यक्ष अमरजित साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्यातील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची युवक आघाडी नव्याने सज्ज करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष म्हणून महेशराजे भोसले, फादर बॉडी तालुका उपाध्यक्ष निलेश झोळ पाटील (वाशिंबे), शरद नेटके (फिसरे), तालुका सरचिटणीस सुरेश शिंदे (शेलगाव- क), तालुका चिटणीस विशाल पाटील (वरकटने), कोषाध्यक्ष शिवाजी जाधव (राजुरी) आणि कार्यकारिणी सदस्य आदी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देताना सांगितले की, करमाळा तालुक्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तमरीत्या व्हावी आणि पक्ष मजबूत व्हावा यासाठी पदाधिकाऱ्यांनी योगदान द्यावे, त्याबरोबरच समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्षाची ध्येय धोरणे तसेच आदरणीय पवार साहेब यांचे विचार तालुक्यात सर्व दूर पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रा.हरिदास रणदिवे, प्रदेश प्रवक्ते प्रा.तळेकर, महिला प्रदेश उपाध्यक्ष विनंती कुलकर्णी , उद्योग आघाडी चे नागेश फाटे, महिला जिल्हाध्यक्ष पल्लवी पाटील, युवक जिल्हाध्यक्ष सूरज देशमुख आदी मान्यवरासह जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.
