May 5, 2026
IMG-20260504-WA0039

करमाळा_चौफेर (शंभू फरतडे )

माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 4 मे रोजी पं.स. सभागृहात झालेल्या पाणी टंचाई आढावा बैठकीत खासदार आक्रमक झाले. ‘शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केल्यास गाठ माझ्याशी आहे’ असा थेट इशारा देत त्यांनी ‘टेल टू हेड’ पाणी सोडण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. ‘पाणी वाटपावरून राजकारण करू नका’ असे आवाहनही त्यांनी केले. महावितरण विरोधात बोलल्यानंतर गुन्हे दाखल करू अशी धमकी देतात अशी तक्रार ऐका शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती. या बैठकीस तहसीलदार शिल्पा ठोकडे,अतिरिक्त गटविकास अधिकारी किरण सुर्यवंशी , साह्यक गटविकास अधिकरी श्री जरांडे, यांंचसह सर्व ग्रामसेवक, अधिकरी उपस्थित होते. बैठकी  त काय घडलं ? कोणी उपस्थित केले मुद्दे?

१. जातेगाव येथील जलजीवन काम सुरू करावे टेल टू हेड’ का पाणी दिलं नाही? असा सवाल संतोष वारे यांनी उपस्थित केला.

२. राष्ट्रवादी अध्यक्ष व पंचायत समिती सदस्य भरत आवताडे यांनी दहिगाव आवर्तनापासून गावे वंचित राहिल्याने अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी अधिकाऱ्यांची भांबेरी उडाली 17 गावं की 7 गावं वंचित राहिली यावर समाधानकारक उत्तर देता आलं नाही

३. जिल्हा परिषद गटनेत्या रश्मी बागल यांनी देखील दहिगाववरून अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले

४. दहिगाव च्या अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तर देता आली नाहीत. पावसाळ्यात पाणी जास्त असल्याने जास्त डिस्चार्ज असतो म्हणून ओढ्याने पाणी सोडता येतं, परंतु सध्या पाण्याची कमतरता असल्याने जिथं चाऱ्या उपचाऱ्या यांचे काम अपूर्ण आहे तिथं पाणी अपव्यय होणार असल्याने सोडता आलं नाही असा बचाव करून वेळ मारून नेण्यात आली ५. शेतकरी संघटनेचे बाळासाहेब गायकवाड यांनी झरे व परिसरातील शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नावर आवाज उठवला. तर पत्रकार युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी कोळगाव सबस्टेशनवरून होत असलेला कमी दाबाने वीज पुरवठा, पाणी खाली सोडणे, महावितरणकडून बसवले जाणारे बोगस डिपी, व सोलर कनेक्शनला तात्काळ मंजुरी मिळावी या विषयावर आवाज उठवला.६. धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष माजी सभापती शिवाजीराव बंडगर सर व आदिनाथचे व्हा. चेअरमन महेंद्र पाटील यांनी उजनीच्या पाणी सोडण्याबाबत अभ्यासपूर्ण मागणी केली. समांतर जलवाहिनीद्वारे पाणी सोडल्यास 25 टीएमसी पाणी वाचू शकते असे बंडगर व महेंद्र पाटील यांनी सांगितले.

७) प्रहार चे संदीप तळेकर यांनी जलजीवन व केम परिसरातील वीजे संदर्भात प्रश्न उपस्थित केले.तर सचिन नलवडे यांनी कामोने येथील जलजीवन टाकीच्या अर्धवट टाकीचा मुद्दा उपस्थित केला.

कोण आलं कोण नाही?  

●संजयमामा – बागल गटाची पंचायत समितीवर सत्ता आहे. आजच्या बैठकीस रश्मी बागल यांच्यासह शिंदे-बागल युतीचे सभापती उपसभापती सर्व सदस्य उपस्थित होते.

●. आमदार नारायण पाटील यांनी मात्र या बैठकीस येण्याचे टाळले त्याचबरोबर पाटील गटाचे आजी-माजी सभापती सदस्य देखील या बैठकीस उपस्थित नव्हते. नारायण पाटील यांचे विश्वासू देवानंद बागल मात्र उपस्थित होते

●’सुप्त संघर्ष’ उघड – आमदार पाटील-मोहिते पाटील वाद आता लपून राहिला नाही. खासदारांच्या बैठकीला आमदारांची दांडी म्हणजे ‘कोल्ड वॉर’ आता ‘हॉट’ झाला असे नाकरता येणार नाही.

● करमाळा शहरातील नगर पालिकेवर वर्चस्व मिळवलेले सावंत गटाचे नगरसेवक, नगराध्यक्ष या बैठकीस उपस्थित राहिले नाहीत. नगरपरिषद निवडणुकीत मोहिते-पाटील यांनी जयवंतराव जगताप गटाला समर्थन दिले होते.

●शिंदे-बागल-मोहिते जवळीक? संजयमामा शिंदे गट एरव्ही मोहिते पाटलांवर टीका करतो. पण आज त्यांचेच सर्व पदाधिकारी खासदारांच्या बैठकीला हजर राहिले, राजकारणात कोणच ‘कायम शत्रू-मित्र’ नसतात हे पुन्हा सिद्ध झाले. करमाळा तालुक्यात नव्याने काय समीकरणं घडणार का याची चर्चा?●खासदारांची सयमी उत्तरे– आमदार नारायण पाटील यांच्या अनुपस्थितीत बाबत पत्रकारांनी विचारले असता आबांचे प्रतिनिधी देवानंद बागल उपस्थित आहेत. आबांचा नियोजित कार्यक्रम असल्याने उपस्थित नसल्याचे सांगून सयंमी उत्तर दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *