करमाळा_चौफेर (शंभू फरतडे ✍️)
सामाजिक ऐक्य, मानवता आणि सर्वधर्म समभावाचा संदेश देणाऱ्या श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याची जय्यत तयारी करमाळ्यात उत्साहपूर्ण वातावरणात सुरू झाली आहे. रविवार, दि. 10 मे 2026 रोजी चांदगुडे प्लॉट, बायपास रोड येथे होणाऱ्या या भव्य सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज अध्यक्ष गणेश चिवटे यांच्या शुभाह्ते विधिवत पुजा करून मैदान स्वच्छता व मंडप उभारणीच्या कामास सुरुवात करण्यात आली.
यावेळी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ चिवटे म्हणाले, “हा विवाह सोहळा केवळ लग्न समारंभ नसून गरजू कुटुंबांना आधार देणारा, त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणारा आणि समाजात एकोप्याचा संदेश देणारा उपक्रम आहे. प्रत्येक वधू-वराने आनंदाने संसाराची सुरुवात करावी ही श्रीराम प्रतिष्ठानची भावना आहे.”
“समाजातील दानशूर व्यक्ती, सेवाभावी कार्यकर्ते आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम दरवर्षी अधिक भव्य होत आहे. प्रतिष्ठानचा प्रत्येक कार्यकर्ता हा स्वतःच्या घरचा समारंभ समजून या सोहळ्यासाठी परिश्रम घेत आहे,” असे चिवटे यांनी सांगितले.
यंदाचा हा विवाह सोहळा चौथ्या वर्षात पदार्पण करत असून अधिक नियोजनबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडणार आहे. या उपक्रमामुळे अनेक गरजू कुटुंबांना दिलासा मिळत असून तालुक्यात सर्वत्र या सामुदायिक विवाह सोहळ्याची चर्चा आहे.
मंडप भूमिपूजन व पूजाविधी प्रसंगी महाराष्ट्र चॅम्पियन अफसर तात्या जाधव, नगरसेवक रामभाऊ ढाणे, विजय घोलप, उद्योगपती राजूकाका शीयाळ, भाजपाचे ज्येष्ठ नेते संजयअण्णा घोरपडे, विलास आबा जाधव, भीष्माचार्य चांदणे, बाळासाहेब गोरे गुरुजी, अमोल पवार, नितीन झिंजाडे, सोमनाथ घाडगे, सचिन गायकवाड, बंडू शिंदे, दादा देवकर, जयंत काळे पाटील, दिनेश मडके, नितीन निकम, सचिन भणगे, प्रमोद फंड, बाबा घोडके, स्वानंद वांगडे, हर्षद गाडे, संजय दुर्गुळे, राजेश पाटील, वसिम सय्यद, अशोक मोरे, संदीप काळे, गणेश गोसावी, विनोदी इंदलकर, भरत गुंड, संदीप रेगुडे, महेश दिवाण, प्रसाद कोकीळ, शैलेश राजमाने यांच्यासह श्रीराम प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
