May 1, 2026
IMG-20260501-WA0043

करमाळा_चौफेर

भाजपा प्रज्ञासेल जिल्हाध्यक्ष तथा वंदेमातरम शक्तीसेनेचे अध्यक्ष सुहास घोलप यांचे चिरंजीव अधिराज सुहास घोलप याने लातूर येथील जयक्रांती सेमी इंग्लिश स्कूल मधून इयत्ता नववीत 95.33 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. जयक्रांती कॉलेज, लातूर येथे झालेल्या पालक मेळावा व निकाल वितरण समारंभात अधिराजचा प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ व पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.प्राचार्य प्रशांत घार, पर्यवेक्षक तानाजी घाटके, शिक्षक विश्वनाथ सिंधीकुमठे, गिरीश रंदाळे, नंदकिशोर माळी, डॉ. गणपत माने, डॉ. सुशील शिंदे, संभाजी वारकड, रामदास लातूरे, अमर येळंबकर, संगमेश्वर भेंडेगावे, संकेत बनसोडे, गजानन घोंगडे, आकाश लोहार, अमित भालके, शिक्षिका नीता तांबळे, रंजना राशिनकर, गीता पाटील यांच्यासह पालक, विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिराजच्या या यशाबद्दल लातूरसह करमाळ्यातही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वडील सुहास घोलप यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेत अधिराजने शैक्षणिक क्षेत्रातही नाव कमावलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *