May 1, 2026
IMG-20260428-WA0036

(करमाळा_चौफेर शंभू फरतडे ✍️)

केम (प्रतिनिधी) करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघातील केम जवळील बादलेवाडीचा सुपुत्र हर्षवर्धन अरुण वाघमोडे याने CBSE दहावी परीक्षेत 98.20 टक्के गुण मिळवत नवोदय विद्यालय, ठाणे-पालघर मधून पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या घवघवीत यशामुळे पंचक्रोशीतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.हर्षवर्धनने जिद्द, चिकाटी आणि कठोर मेहनतीच्या जोरावर हे यश संपादित केले. त्याला विहाळ येथील आजोबा व पाटबंधारे खात्यातील माजी अधिकारी कारभारी बंडगर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. नवोदय सारख्या नामांकित शाळेतून 98.20%गुण घेणे म्हणजे मोठे यश आहे.ग्रामीण भागातील, बादलेवाडीसारख्या छोट्या गावातील विद्यार्थ्याने CBSE बोर्डात टॉप करणं ही अभिमानाची असून हर्षवर्धनच्या यशाने नवोदय विद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नवी ऊर्जा मिळाली आहेकरमाळा व माढा तालुक्यातील अनेक मान्यवरांकडून हर्षवर्धन याचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *