April 29, 2026
IMG-20260429-WA0003

           करमाळा_चौफेर (शंभू फरतडे✍️)

पोलिसांनी ‘भोंदूबाबा ऑपरेशन’ सुरू केलं, पण अशोक खरात प्रकरणानंतरच का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.आठ दिवसांत आठ भोंदू बाबांवर कारवाई झाली, त्यात मनोहर मामा भोसलेचेही नाव आहे. पण इतके दिवस यंत्रणा झोपली होती का? असा सवाल आता जनतेतून विचारला जातोय.मनोहर मामा यांच्यावर अडिच लाख रुपयांची मागणी करून पन्नास हजार घेतल्याचा आरोप होतो व लगेच मनोहर भोसले यांना अटक होते.याच्या मागे काही षडयंत्र नाही कशावरून? कारण आज मनोहर भोसले याच्या दरबारात येणारी कोट्याधीश हाय प्रोफाईल भक्त, अनेक मंत्र्यांशी खुद्द मुख्यमंत्र्यांशी जवळीक पहाता एखाद्याचे चाळीस पन्नास हजार घेऊन आपले चांगला चालेला दरबार कशाला अडचणीत आणतील ,हा देखील प्रश्न आहे .यात मनोहर भोसले यांची बाजू घेण्याचा प्रश्न नाही पण सध्या सिस्टम ज्या पद्धतीने काम करतेय त्यामुळे शंकेची सुई निर्माण होत आहे. मनोहर मामांवर आरोप करणारा सबंधित तक्रारदार कोणाच्या माध्यमातून मनोहर भोसलेपर्यंत पोहचला? त्याचे कुणाशी धागेदोरे आहेत? तो आगोदर कोणाच्या संपर्कात होता? हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे. एखादे बनावट ग्राहक पाठवून अवैध धंद्यावर कारवाई करायची व तोडपाणी करून सोडायचे, अशातला तर हा प्रकार नाही ना, अशा चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. (कारण यंत्रणेतील अनेकांनी २०२१ च्या प्रकरणात महागडे मोबाइल, घड्याळ,गिफ्ट घेतले होते अशी सोशल मीडियावर चर्चा होती)आज ज्या 7-8 भोंदूबाबांवर कारवाई झाली, त्यांच्या अवैध मालमत्तेवर चर्चा होत आहे. पण हा सगळा दोन नंबर पैसा एक नंबर करून देणारे सिस्टीम’मधले भोंदू’ कोण आहेत हे जगजाहीर होईल का? अशी देखील चर्चा जनमानसात होताना दिसत आहे. सोशल मीडियावर आज असंख्य बाबांचे व्हिडिओ व्हायरल आहेत.ज्यांच्या दरबारात श्रद्धा-अंधश्रद्धेचा बाजार खुलेआम सुरू आहे .त्यांना अटकाव कधी होणार? का ते कोट्याधीश होण्याची यंत्रणा वाट बघतेय का ? व कोट्याधीश झाल्यानंतर त्यांना अडचणीत आणायचं, असे यंत्रणेचे ठरलंय ? हा मुद्दा सुद्धा विचार करण्या जोगा आहे.वास्तविक दारूचे दुकान असो, मटक्याचा अड्डा असो किंवा बुवाचा मठ असो ,तिथे बळजबरीने नेले जात नाही,मग जातो कोण? जे जातायत ते लुटलेले पचवण्यासाठी, ज्यांना लुटायचं आहे ते ,, ज्यांना खुप श्रीमंत बनायचं आहे ते ,किंवा कोणावर तरी काळी जादू करून संपवायचं आहे ते असे भिखार वृत्तीचे लोक अशा भोंदुच्या पायवार लोळत आहेत. सर्वसामान्य शेतकरी ,मजूर जातोय का ? गेला तर फक्त प्रवचन ऐकून नेमकं काय चाललय बघून भंडाऱ्यात जेवण करून येतोय.पण सामाजात भस्म्या झालले अनेक भस्मासुर आहेत ज्यांना भ्रष्टाचार, पैसा, वासना ,सत्ता याचा भस्म्या झाला आहे. अशा या लोकांनी संप्रदाय, लोककला , परंपरा नासवण्याचे काम सुरू केले असून यातुन अनेक बुवा आणी बाया महाराष्ट्रात मोकाट सुटल्या आहेत व सर्वत्र यांचा नंगानाच सुरू आहे.संप्रदायातुन जातीयवाद राजकारण करायचे, लोक कलेतुन बिभत्स अंगप्रदर्शन करून युवा पिढी भरकटवली जात आहे .अशा मस्तवाल बुवा व बाया यांच्याकडे असलेला पैसा व प्रसिद्धी पाहून हि सडलेली यंत्राणा अशी लोकं अडचणीत कुठे सापडतात का हे पहात असते.व अडचणीत आल्यानंतर यांचा कायमचा बंदोबस्त करण्या ऐवजी ‘आपला हात धुवून घेतात व पुन्हा मोकाट सोडतात ,पुन्हा हात पाय धूवून घेण्यासाठीच.अशी बोचरी टिका आता लोकांत सुरू आहे.

ज्यांच्याकडे खरात प्रकरणाच्या तपासाची धुरा आहे, त्यांच्याकडेच २०२१ मध्ये मनोहर मामाची पण होती .”याचे काय झाले, मग त्याचे काय होईल, तुम्हीच ठरवा.”

लोकांनी आता हात दाखवून अवलक्षण करून घेण्या पेक्षा अशा अंधश्रद्धे पासून दुर रहावे.हेच उत्तम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *