April 25, 2026
IMG-20260425-WA0007

 करमाळा चौफेर

महाराष्ट्रात अनेक राजकीय नेते,केंद्रीय मंत्री, बिल्डर आणि उच्चपदस्थ अधिकारी  अभिनेत्यांशी (हायप्रोफाईल भक्त) नाव जोडले  गेलेल्या  कथित ‘हायप्रोफाईल गुरू’ मनोहरमामा ला पोलीसांकडून पुन्हा एकदा दणका देण्यात आला  आहे. कुर्डवाडी येथे दाखल झालेल्या एका जादुटोणा व फसवणूक प्रकार च्या गुन्ह्यात सोलापूर पोलीसांकडून पुणे येथे मुसक्या मनोहर मामांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. मनोहर मामा भोसले (पूर्ण नाव: मनोहर उर्फ मामा भोसले) हे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील रहिवासी असून ते स्वतःला ‘बाळूमामांचा अवतार’ म्हणवून घेतात.त्यांनी बाळूमामांची मालिका काढून बाळूमांमाच्या श्रद्धेच्या आडून स्वतःचा दरबार मोठा केला आहे.

त्यांनी उंदरगाव येथे बाळूमामांचे मंदिर आणि एक आध्यात्मिक मठ उभारला आहे. मात्र २०२१ ला दाखल झालेल्या बलात्काराच्या गुन्हयानंतर उंदरगाव सोडून करमाळा तालुक्यातीलच घोटी गावात आपले बस्तान बसवले होते .अशोक खरात प्रकरणानंतर ते देखील भुमिगत होते. ते ज्योतिषाचार्य असल्याचीही त्यांची ओळख आहे.२०२१ मध्ये त्यांच्यावर भाविकांची आर्थिक फसवणूक आणि एका महिलेवर बलात्कार केल्याचे गंभीर आरोप झाले होते.कर्करोग (कॅन्सर) बरा करण्याचा दावा करून लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी त्यांना अटक केली होती.या प्रकरणांमध्ये त्यांना नंतर सत्र न्यायालयाकडून जामीन मिळाला.शरदचंद्र पवार सुप्रिया सुळे,नाना पटोले, नितिन गडकरी,एकनाथ शिंदे ,व देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील मनोहर मामांचे फोटो व्हायरल झाले आहेत. अनेक आमदार खासदार मंत्री मनोहरमामांच्या पायी लिन होतात. विशेष म्हणजे बलात्कार व फसवणूक चा गुन्हा दाखल झाल्यानंतर या मनोहर मामांच्या लोकप्रियेत प्रंचड वाढ झाली आहे. महाराष्ट्रभर त्यांचे शिष्य निर्माण झाले आहेत. त्यांच्या दरबार ला प्रचंड गर्दी व अलिशान गाड्यांनी मैदान भरलेले अनेक व्हिडीओ आहेत. मामा  सोशल मीडियावर देखील सक्रिय असून त्यांचे ‘manoharmamaofficial’ नावाचे Instagram आणि Facebook पेज आहे, जिथे त्यांचे अनुयायी त्यांच्या उपक्रमांचे व्हिडिओ शेअर करत असतात.सिने सृष्टीशी निगडित अनेक अभिनेत्यांनी त्यांचे पाय धूवून मोठमोठे हार घालून पुजा केलेले व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या गाणगापूर येथे देखील भव्य मठ स्थापन केला असून तिथे देखील दरबार पुजा अर्चना होम हवन होत असल्याचे व्हिडीओ त्यांच्या पेजवर आहेत. काल झालेल्या गुन्ह्या संदर्भात त्यांना कोर्टापुढे हजर केले जाणार आहे .त्यांच्यावर नेमकी काय कलमे लावली आहेत, आज जामीन होणार का? या कडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *