करमाळा चौफेर (शंभू फरतडे✍️)
“आजच्या काळात जिथे प्रत्येकजण स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या प्रपंचाचा विचार करतो, तिथे काही अशी व्यक्तिमत्वे असतात जी समाजाच्या सुखासाठी स्वतःचे आयुष्य अर्पण करतात. स्वतःच्या घरापेक्षा वस्तीतील गरिबांच्या चुलीची काळजी वाहणारा आणि लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणारा कार्यकर्ता खऱ्या अर्थाने समाजाचा आधारस्तंभ असतो. रक्ताच्या नात्यापेक्षाही माणुसकीचे नाते मोठे मानून, जनसेवेचा वसा घेतलेल्या या निस्वार्थी नेतृत्वामुळेच आजही लोकशाहीचा कणा ताठ आहे. अशा झोकून देऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहणे, हीच काळाची गरज आहे.”

पोथरे येथील सर्वसामान्य नाभिक कुटुंबात जन्माला आलेले विष्णू आण्णा रंदवे यांना तरूण वयापासून समाजसेवेची आवड आहे. आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतुन त्यानी आपला प्रपंच संभाळात आपल्या समाजासह तळागाळातील सर्व सामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कार्य सुरू केले .

आपल्या कामातून वेळ काढून स्वतः जातीने तहसिल कार्यालय, पंचायत समिती ,शासकीय दवाखान्यात उपस्थित राहुन सर्व सामान्य लोकांच्या अडचणी सोडवण्यास सुरवात केली याच दरम्यान शिवसेनेते तात्कालिन नेते शिवाजीराव मांगले तसेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाहूदादा फरतडे यांच्या मार्गदर्शनातुन शिवसेनेची शाखा स्थापन करून पक्षाचे काम सुरू केले.

सर्व सामान्य जनते बद्दल असलेल्या तळमळची जाणीव ठेवून पोथरे ग्रामस्थांनी रंदवे यांना ग्रामपंचायत सदस्य व सरपंच पदावर काम करण्याची संधी दिली .सरपंच म्हणून काम करत असताना अनेक गोरगरीब गरजू लोकांपर्यंत घरकुल, विहिरी अशा योजना पोहोचवण्याचे काम केले. तसेच पोथरे व परिसरातील अनेक हजारो निराधार माता भगिनींना संजय गांधी निराधार योजना,श्रावण बाळ योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रमाणीक प्रयत्न केला.
मध्यंतरी सत्तेच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवण्यात यश येईल या अपेक्षेने भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. किसान मोर्चा चे ते पदाधिकारी होते, पंचायत समिती निवडणूकीत टिकीट नाकरल्याने ते रासप मधून उभा होते. परंतू सध्या निवडणुकीच्या रिंगणात जेव्हा एखादा कार्यकर्ता आपला प्रपंच बाजूला सारून समाजासाठी आयुष्य झिजवतो, तेव्हा त्याच्या पदरात मतांऐवजी उपेक्षा पडते, हे लोकशाहीचे दुर्दैव आहे. रक्ताचे पाणी करून लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणाऱ्या कार्यकर्त्यापेक्षा, निवडणुकीच्या चार दिवसांत पैसे वाटणाऱ्या ‘धनदांडग्यांच्या’ मागे उभा राहण्याची समाजाची गुलामी मानसिकता झाली आहे याचा फटका रंदवे यांना देखील बसला मात्र जय परायज याची चिंता न करता समाज सेवेचा वसा रंदवे यांनी सुरूच ठेवला आहे.
दरवर्षी रंदवे यांचे कुटुंबीय आण्णांचा वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम, अन्नदान, जिल्हापरिषद शाळेतील विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप असे उपक्रम राबवत असते.

सर्वसामान्य कुटुंबातील असून देखील आपल्या सारख्या अनेक सामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या निस्वार्थी लोकसेवकास सा करमाळा चौफेर च्या वतीने वाढदिवसानिमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा.


