करमाळा चौफेर
करमाळा शहरातील आर्थिकदृष्ट्या गोरगरीब व तळागाळातील जनतेला तात्काळ व मोफत आरोग्य उपचार सुविधा देण्याबाबत करमाळा नगरपालिका व आरोग्य विभाग निश्चितपणे अधिक वेगवान व तत्पर राहील याची ग्वाही करमाळा नगर परिषदेचे नगरसेवक व कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक सचिन घोलप यांनी आज कानड गल्ली येथे संपन्न झालेल्या आरोग्य केंद्राच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने दिली .

आज करमाळा येथे नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राच्या उद्घाटन करमाळा शहरातील जेष्ठ माजी नगरसेवक रामचंद्र घोलप यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून करमाळा नगरीच्या प्रथम नागरिक व नगराध्यक्षा माननीय मोहिनीताई सावंत या उपस्थित होत्या .

हिंदुहर्दय सम्राट “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेतून नागरी आरोग्य सुविधा वर्धनी केंद्राचे उद्घाटन आज कानड गल्ली येथे संपन्न झाले यावेळी विद्यमान व कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक नगरसेवक सचिन घोलप व नगरपालिकेच्या सर्व मान्यवर नगरसेवक अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

यावेळी नगरसेवक सचिन घोलप यांच्या प्रयत्नातून व पाठपुराव्यामुळे केंद्र सरकारच्या नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राला मंजुरी मिळून आज त्याचे उद्घाटन झाले आपल्या प्रास्ताविकात नगरसेवक सचिन घोलप यांनी हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना या योजनेखाली करमाळा शहरातील हा तिसरा दवाखाना असून या अभिनव अशा आरोग्य योजनेतून गोरगरीब व तळागाळातील आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या रुग्णांना मोफत व तात्काळ आरोग्य सुविधा मिळणार असल्याचे सांगतीले तसेच या केंद्रातून गोळ्या औषधे शुगर बीपी तपासणी रक्त लघवी साखर तपासणी करणे सुद्धा शक्य असल्याचे सांगतीले.

करमाळा शहरातील गोरगरीब रुग्णांना एक प्रकारे दिलासा मिळणार आहे या आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये एक एमबीबीएस अथवा बीएचएमएस दर्जाच्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली गेली असून त्यांच्याकडून रुग्णांची यथायोग्य तपासणी होईल या आरोग्यवर्धिनी केंद्राच्या पाठपुराव्यासाठी आमच्या नेत्या महिला भाजपा प्रदेश उपाध्यक्षा व जिल्हा परिषदेच्या गटनेत्या आदरणीय रश्मीदीदी बागल व भाजपचे युवा नेते माननीय दिग्विजय भैया बागल यांनी महत्त्वाचे व अनमोल असे सहकार्य केल्याची भावना यावेळी सचिन घोलप यांनी व्यक्त केली .
आरोग्यवर्धिनी केंद्र सकाळी आठ ते बारा तर संध्याकाळी चार ते सहा या वेळेत रुग्णांसाठी उपलब्ध असून रविवारी व राष्ट्रीय सणांच्या दिवशी त्याला सुट्टी असेल रुग्णांनी या आरोग्य केंद्राचा जास्तीत जास्त लाभ घेण्याबाबत श्री घोलप यांनी आवाहन केले.
या कार्यक्रमासाठी करमाळा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा मोहिनीताई सावंत उपनगराध्यक्ष अतुल फंड विरोधी पक्ष नेते प्रशांत ढाळे नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन तपसे तालुका आरोग्य अधिकारी महेश्वर काटकर नगरसेवक संजय सावंत पाणीपुरवठा समितीचे चेअरमन नगरसेवक विक्रमसिंह परदेशी स्वच्छता व आरोग्य समिती सभापती पूजाताई इंदलकर बांधकाम समितीच्या सभापती नगरसेविका लताताई घोलप नगरसेविका दिवाबत्ती व ग्रंथालय समितीच्या सभापती निर्मला गायकवाड नगरसेविका स्वातीताई फंड नगरसेविका चैत्राली सावंत नगरसेवक दीपक चव्हाण नगरसेविका सुनीताताई ढाणे ज्योत्स्नाताई लुनिया नगरसेवक संदीप कांबळे नगरसेविका जबीन मुलानी नगरसेवक रवी जाधव सुवर्णा आलाट युवराज चिवटे नगरसेविका अश्विनी अब्दुले नगरसेविका साजदा कुरेशी यांच्यासह सर्व नगरसेवक सामाजीक कार्यकर्ते विजयराव लावंड सोमा माने बाबासाहेब माने भाऊ राखुंडे डॉक्टर पद्माळे व त्यांचे सर्व स्टाफ उपस्थित होते.

कार्यक्रमात प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत मुख्याधिकारी श्री सचिन तपसे यांनी केले तर सूत्रसंचालन पंचायत समितीच्या आरोग्य विभागाचे श्री शिवाजी खंडागळे यांनी केले तर आभार बांधकाम समितीच्या सभापती लताताई घोलप यांनी आभार मानले.
