March 24, 2026
IMG-20260324-WA0017

 

जेऊर (ता. करमाळा) येथे आयोजित २४ व्या महिला महोत्सवाच्या सांगता समारंभात सौ. ज्योतीताई नारायण पाटील यांनी “महिला सक्षम तरच देश सक्षम” असा मोलाचा संदेश दिला आहे. जेऊर येथे आमदार नारायण आबा पाटील मित्र मंडळाच्या वतीने आयोजित महिला महोत्सव कार्यक्रमात त्या बोलत होत्या.या वेळेस व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या सौ. वंदना दादासाहेब पाटील, नुतन पंचायत समिती सदस्या सौ. आदिती अतुलभाऊ पाटील, नुतन पं.स. सदस्या सौ.ललीता धनंजय शिरस्कर, सौ.अनिता राजाभाऊ जगताप, सौ.उषा अर्जुन सरक, सौ.शिवांजली योगेश कर्णवर, श्रीमती वंदना बागल यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी सौ.ज्योतीताई पाटील यांचेहस्ते कृषीभूषण दादासाहेब पाटील यांच्या पत्नी सौ वंदना पाटील यांचा मानचिन्ह देऊन आदर्श महिला शेतकरी पुरस्काराने सन्मान करण्यात आला तसेच श्रीमती वंदनाताई बागल यांना आदर्श महिला उद्योजिका पुरस्काराने गौरविण्यात आले.

या बक्षिस वितरण सोहळ्यात डान्स स्पर्धा सोलो डान्स १) मेघा जाधव २)आशा निमगिरे ३) अंकीता वेदपाठक तर ग्रुप डान्स १) युनिटी ग्रुप २)प्रियंका पाटील व सुचेता दगडे ग्रुप ३) हॅपी वुमेन्स ग्रुप तर उत्तेजनार्थ केमीस्ट ग्रुप तर रांगोळी स्पर्धा १) अश्विनी बादल २)मनिषा उघडे ३) स्वाती व्हरे तर उत्तेजनार्थ अश्विनी सोहनी,दिप्ती कुलकर्णी व स्वाती बोराडे तसेच वक्तृत्व स्पर्धा १) मनिषा वनवे २)अपर्णा पाथ्रुडकर ३)सुरेखा शिंदे तसेच उत्तेजनार्थ रेश्मा दुनाखे यांना बक्षिसे देण्यात आली.तर उखाणे स्पर्धेत १) लक्ष्मी घाडगे २) वनमाला शिंदे ३) प्रियंका पाटील (होगले) तर उत्तेजनार्थ उज्वला कळसाईत व जयश्री कांबळे यांनी बक्षिसे पटकावली.तसेच अभिनय स्पर्धा १) नारीशक्ती ग्रुप – मी सावित्री २) संध्या हेळकर – मी सिंधुताई सपकाळ ३) अपर्णा पाथ्रुडकर – झांसी की रानी तर उत्तेजनार्थ रोहिणी हेळकर, सुनिता कुलकर्णी व सत्यभामा मोहिते यांनी बक्षिसे मिळवली. तर वेशभुषा स्पर्धेत १) प्रतिक्षा शेटे देशमुख – महाराणी येसूबाई २) मनिषा लोंढे- आदिवासी महिला ३) मेघा जाधव – शेतकऱ्याची बायको तर उत्तेजनार्थ कल्पना आखाडे -तमिळ स्त्री या वेशभुषे बद्दल बक्षिसे देण्यात आली.

रिल स्पर्धेत १)भाग्यश्री नवले २)अपर्णा पाथ्रुडकर व अर्चना कुलकर्णी ३) सुचिता राठोड तसेच उत्तेजनार्थ अंकिता वेदपाठक व संगिता बोराडे या विजयी झाल्या. तर अंताक्षरी मध्ये १) सखी ग्रुप २) सतरंगी ग्रुप ३) स्वरगंगा ग्रुप तर उत्तेजनार्थ सहेली ग्रुप यांना बक्षिसे दिली गेली. कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या. सुत्रसंचलन रोहिणी सुतार व सुलभा घाडगे यानी केले तर आभार समृध्दी कुलकर्णी हिने मानले. कार्यक्रमानंतर जेऊर ग्रामपंचायतीच्या वतीने उपस्थित महिलांना स्नेह भोजन ठेवण्यात आले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *