July 23, 2026
IMG-20260723-WA0030(1)

करमाळा_चौफेर (मिरगव्हाण ता करमाळा)

ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ज्ञ नेत्रसेवा मोफत उपलब्ध करून देण्यासाठी   मिरगव्हाण ता. करमाळा  येथील ‘आपलं गाव आपली माणसं’ सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने आणि एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, महम्मदवाडी, हडपसर, पुणे यांच्या सहकार्याने दि. २३ जुलै रोजी मिरगव्हाण येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  या शिबिराला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला. एकूण ९० नागरिकांनी शिबिरात सहभाग घेऊन नेत्र तपासणी करून घेतली. यामध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवकांचा मोठ्या संख्येने समावेश होता. तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन केले तसेच पुढील उपचारांबाबत सल्ला दिला.शिबिर यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ, तरुण मंडळाचे सदस्य आणि ‘आपलं गाव आपली माणसं’ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. मोफत आरोग्यसेवा मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करून आयोजकांचे आभार मानले. या शिबिरात महिला, ज्येष्ठ आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि मोफत सेवा मिळाल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले.  शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व ग्रामस्थ, तरुण मंडळ आणि कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *