July 10, 2026
IMG-20260710-WA0049

करमाळा-चौफेर (शंभू फरतडे ✍🏻) 

वीज कपातीने त्रस्त असलेल्या करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. कालच विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर शेतकऱ्यांची व्यथा मांडणारे आमदार नारायण आबा पाटील यांना आज थेट जिल्हाधिकाऱ्यांचा फोन आला आणी शेती पंपासाठी आठ तास वीज देण्याचे आदेश महावितरण ला देण्यात आलले आहेत अशी माहिती स्वतः जिल्हाधिकाऱ्यांकडून आमदार नारायण पाटील यांना कळवण्यात आली.काल अधिवेशनात नारायण आबांनी वीज कपातीचा मुद्दा आक्रमकपणे मांडला. लेखी निवेदनाद्वारे शेतकरी, विद्यार्थी आणि लघु उद्योजकांना होणारा त्रास मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातला. त्याची तातडीने दखल घेत मुख्यमंत्र्यांनी महावितरण आणि जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले.त्याचाच परिणाम म्हणून आज जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः आमदार पाटील यांना फोन करून करमाळा मतदारसंघात शेतीसाठी 8 तास वीज पुरवठा सुरू होणार असल्याचे सांगितले.अधिवेशनापासून ते रस्त्यावरील आंदोलनापर्यंत नारायण आबांनी वीजेचा प्रश्न लावून धरला होता. त्यामुळेच “नारायण आबांनी अधिवेशन गाजवले” अशी चर्चा आता सर्वत्र आहेशेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांकडून आमदार नारायण पाटील यांचे कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *