करमाळा_चौफेर
आदिनाथ मकाई वरून सुरू असलेले आरोप प्रत्यारोप थांबण्या ऐवजी वाढत चाललेले दिसत आहेत, मकाई चे ७३ लाख आदिनाथ कडे असल्याचा पुराव्यानीशी सांगत मकाई चेअरमन दिनेश भांडवलकर यांनी तळेकर यांना उत्तर दिले होते व आदिनाथ लिलावात जाण्याआगोदर मकाई चे ७३ लाख परत करा असे आवाहन दिले होते, यावर तळेकर यांनी विठ्ठल कार्पोरेशन व आदिनाथ व्यवहाराचा उतारा काढून संजयमामा शिंदे यांच्या खाजगी मालकीच्या श्री विठ्ठल कार्पोरेशन लि. या कारखान्याकडे श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे 8 लाख 44 हजार 323 रुपये येणे बाकी असताना विठ्ठल कारखाना विकला गेला, तरी बागलप्रणीत आदिनाथच्या तत्कालीन चेअरमन धनंजय डोंगरे यांनी वसुली का केली नाही याचे उत्तर द्यावे असा प्रतिप्रश्न केला होता.
यानंतर आरोप प्रत्यारोप थांबतील असे वाटत असताना तळेकर यांनी “संघर्ष न्युज” या युट्यूब चॅनल ला मुलाखत देऊन पुन्हा मकाई च्या १४० कोटीचा ताळेबंद व साखर आयुक्तांच्या सह्याचे पत्र समोर करत मकाई चेअरमन दिनेश भांडवलकर यांनी ‘कामगारां पेक्षा व्यापाऱ्यांचे हीत पाहिले’ असा आरोप करत व्यापाऱ्यांसाठी कोणत्या कारणासाठी ४८ कोटींची तरतूद केली असा सवाल विचारला असून कामगारांच्या कष्टांचे ७ कोटी ५८ लाख अडवणूक करून का ठेवले आहेत असा सवाल केला आहे
तसेच साखर प्रकल्प निर्मिती नूतनीकरण, असावानी प्रकल्प, २०२४ \२५ हंगामा साठीचा राखीव निधी भविष्यातील हंगाम निधी याचा तपशीलवार खुलासा करावा अन्यथा आम्ही तो खुलासा करू असा इशारा दिला आहे.
मकाई मध्ये देखील पगारी साठी तसेच उस बील ,वाहतूक दार यांनी आंदोलन केली आहेत, उस उत्पादक, वाहतूक दार कामगार यांची अशीच पिळवणूक झाली तर “मकाईचा आदिनाथ व्हायला वेळ लागणार नाही असा इशारा दिला आहे.
तसेच ४५० कोटींच्या स्थावर मालमत्ता असलेल्या आदिनाथ चा भाडेकरार बागलांनी फक्त शे पाचशे च्या स्टॅम्प पेपरवर का केला? बारामती ॲग्रो सोबत करार झाला असताना बागल गट कोर्टात का गेला? गुळवे यांना आदिनाथ चा पुळका आहे तर २२० कोटींचा दावा आदिनाथ वर का टाकला या प्रश्नांची उत्तरे बागल व गुळवे यांनी द्यावीत असे तळेकर म्हणाले आहेत.
विरोधक पाटील आमदार नारायण पाटील यांच्यावर टिका करत आहेत, स्व गोविंद बापू यांच्यावर देखील टिका करतात असे विचारले असता ज्यांची व्हॅलीडीटी संपली आहे, ज्यांचा कोणत्याच निवडणूकीत एकही उमेदवार नसतो त्यांच्यावर बोलणार नसल्याचा टोला तळेकर यांनी लगावला आहे. यास जगताप यांच्या टिकेची किनार असल्याची चर्चा सुरू आहे
