June 15, 2026
IMG-20260615-WA0070(2)

करमाळा_चौफेर

करमाळा तालुक्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप (भाऊ) यांनी देखील आदिनाथ / मकाई वरून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांवर भाष्य केले असून ‘काय सांगता ‘ या युट्यूब चॅनल वर त्यांची मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. या मुलाखतींतून त्यांनी सुरवातीलाच पाटील गटाकडून आदिनाथ चालवण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी या कुरघोड्या सुरू असल्याचा आरोप करत आमदार नारायण पाटील यांना बोलता येत नसल्याने सुनील तळेकर यांना प्रवक्ता म्हणून पागारी नोकर ठेवले आहे असा घणाघात केला आहे. सुभाष गुळवे,किंवा बागल कुटुंबावर टिका करतान सुनील तळेकर यानी तारतम्य बाळगले पाहिजे आपली पायरी ओळखून रहावे असे देखील जगताप म्हणाले.करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे भेटले,नाहीत, पिंकाची नुकसानभरपाई नाही,वीज प्रश्न आहे. रस्ते नाहीत, रोजगार नाही, नवीन योजना नाहीत. आमदार म्हणून नारायण पाटील हे निष्क्रिय ठरले आहेत आणी यावरून लक्ष विचलित करण्यासाठी विनाकारण “आदिनाथ ला  काठीचं कोल्हं” केलं असून टीकाटिप्पणी सुरू आहे असा संताप जगताप यांनी व्यक्त केला. आदिनाथ च्या आधोगतीस बागल यांना जबाबदार धरता मग तुम्ही त्यावेळेस सत्तेत काय करत होता? असा सवाल जगताप यांनी पाटील यांना केला असून दोन्ही मुलांची शपथ घेऊन सांगा कि आदिनाथ च्या एका ही रुपयांत मि मिंधा नाही असे आवाहन देखील पाटील यांना केले.त्याचबरोबर पश्चिमेच्या तालुक्यातील एक मोठा नेता आदिनाथ घेणार असून सर्व संचालकांच्या सह्याचे पत्र देण्याच्या बदल्यात नारायण पाटील यांना १५ कोटी ठरले असून पहिला हप्ता १० कोटी ठरला आहे नंतर ५ कोटी देणार असून संचालकंना मात्र थोडाफार सत्यनारायणचा प्रसाद मिळणार असल्याची मिश्किल टिप्पणी देखील माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केली आहेआदिनाथ चालवताना मी केवळ १ रूपया मानधन घेतले,सहाशे कोटी हार्वेस्टिंग साठी खर्च केले कामगारांच्या पगारी केल्या, कर्जमुक्त करून हंगाम संपवताना कारखाना एकदम टकाटक दुरूस्त करुन ठेवला होता अडिच कोटी खात्यावर ठेवले होते. मात्र पुढे सत्तेत आलेल्या लोकांनी नेत्यांना देखील आंधारात ठेवून भ्रष्ट कारभार केला व आदिनाथ आधोगतीस गेल्याचा आरोप या मुलाखतींतून करण्यात आला आहे.त्याचबरोबर आदिनाथ च्या उभारणीत स्व गोविंद बापू यांचा मोलाचा वाटा असल्याचे बोलले जाते मात्र माजी आमदार जयवंतराव यांनी स्व गोविंद बापू यांच्या योगदानावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत, चप्पल कपडे घातले नाही म्हणून कारखाने उभा रहात नाहीत, असे सांगून गोविंद बापू यांनी फक्त पाच शेअर गोळा केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे मात्र हे बोलत अताना मृत व्यक्ती विषयी बोलू नये ते मला पितृस्थानी आहेत असे देखील म्हटले आहे. त्याचबरोबर विधान परिषद, तालुक्याचा विकास, या विषयी देखील जयवंतराव जगताप यांनी परखड मतं माडली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *