करमाळा_चौफेर
करमाळा तालुक्यातील पांडे येथे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उभारण्यात आलेल्या पांडे माध्यमिक विद्यालय व श्री योगीराज ॲकडमी चा शुभारंभ सोहळा गुरुवार दि. 11 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.
श्री कमलाभवानी शुगर फॅक्टरी समोर उभारण्यात आलेल्या या सुसज्ज शाळेचे उद्घाटन मा. आमदार संजयमामा शिंदे (करमाळा-माढा विधानसभा) व मा. सभापती विक्रमदादा शिंदे (पं.स. कुर्डुवाडी / चेअरमन-कमलाभवानी ग्लोबल को.लि.) यांच्या शुभहस्ते होणार आहे.
संस्थापक सचिव व प्राचार्य श्री. योगेश पांडुरंग दळवे (सर) यांच्या अथक प्रयत्नातून व शैक्षणिक दूरदृष्टीतून ही शाळा साकार झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व आधुनिक शिक्षण मिळावे, स्पर्धेच्या युगात ते टिकावेत, या उद्देशाने श्री योगीराज ॲकडमीची स्थापना करण्यात आली आहे.
सुसज्ज इमारत, डिजिटल वर्ग, क्रीडांगण, अनुभवी शिक्षकवृंद हि या ॲकडमिची वैशिष्ट्य आहेत
यामुळे परिसरातील पालक व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. करमाळा तालुक्यातील शैक्षणिक विकासाला या शाळेमुळे निश्चितच नवी दिशा मिळणार आहे.
“ग्रामीण भागातील विद्यार्थी गुणवत्तेत शहरी विद्यार्थ्यांच्या बरोबरीने उभा राहावा, हाच आमचा ध्यास आहे. पालकांनी आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या संधीचा लाभ घ्यावा,”असे आवाहन निमंत्रक श्री. योगेश दळवे सर यांनी केले आहे.
या शुभारंभ सोहळ्यास परिसरातील पालक, विद्यार्थी, शिक्षणप्रेमी नागरिक व मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
उद्घाटन स्थळ : श्री कमलाभवानी शुगर फॅक्टरी समोर, करमाळा, ता. करमाळा, जि. सोलापूर.
