May 27, 2026
IMG-20260527-WA0031(1)

करमाळा_चौफेर (शंभू फरतडे ✍🏻)

करमाळा शहरातील मॉन्जिनीजच्या उद्घाटनाला शंभूराजे जगताप व दिग्विजय बागल हे दोन युवा नेते एकत्र आल्याची चर्चा व बातम्या सोशल मीडियासह विविध माध्यमांतून रंगत असतानाच, पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी मोठे राजकीय विधान करून खळबळ उडवून दिली आहे. “पृथ्वीराज पाटील यांच्याकडे तालुक्याचे नेतृत्व करण्याची क्षमता असून इतर गटांकडून त्यांना फारसे आव्हान नसणार,” असे ठाम मत तळेकर यांनी व्यक्त केले आहे.

तळेकर म्हणाले, “पृथ्वीराज पाटील यांच्याकडे करमाळा तालुक्याच्या विकासाचे एक स्पष्ट व्हिजन आहे. त्यामुळे तालुक्यातील युवक सध्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या संपर्कात येत आहेत. सध्या करमाळा तालुक्यातील युवकांचे आयकॉन म्हणून पृथ्वीराज पाटील यांच्याकडे पाहिले जाते.”” एकाच गावात स्वतःला गुंतवून न ठेवता पृथ्वीराज पाटील दिवसभर विविध गावांना, कार्यक्रमांना भेटी देत असतात. युवकांचे संघटन करण्यातच त्यांचा जास्त वेळ जातो,” असेही तळेकर यांनी सांगितले. रिटेवाडी योजना हा पृथ्वीराज यांचा जिव्हाळ्याचा विषय असल्याचे सांगून तळेकर पुढे म्हणाले, “आरोग्य, शिक्षण, कृषी, उर्जा, दळणवळण, रस्ते, सिंचन या बाबतीत सतत माहिती घेण्यास ते उत्सुक असतात. जेऊर सारख्या मोठ्या गावाचे नेतृत्व करत असताना आमदार नारायण आबा पाटील यांच्या प्रशासकीय नियोजनातही त्यांच्या सूचनांचा विचार केला जातो.”सर्वात महत्त्वाचे म्हणजे, “पृथ्वीराज पाटील हे तालुक्याचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम असल्याने पाटील गटाकडून संधी दिली गेल्यास ते कधीही विधानसभा निवडणूक रिंगणात उतरू शकतात,” असे सुचक विधान तळेकर यांनी केले आहे.पाटील गटाकडून पृथ्वीराज पाटील यांना 2029 मध्ये संधी दिली जाते की 2034 मध्ये निवडणूक लढवणार, याबद्दल आता सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. तळेकर यांनी पृथ्वीराज पाटील यांच्या आगामी राजकीय वाटचालीबाबत संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पाटील गटाच्या तरूण वर्गात उत्साह निर्माण झाला आहे. दिग्विजय बागल यांना सहकारातील दांडगा अनुभव असुन ते मकाई कारखान्याचे चेअरमन होते. तसेच त्यांनी विधानसभा निवडणुकही लढवली असल्याने तेही प्रबळ दावेदार ठरु शकतात.तर शंभुराजे जगताप यांनाही आता पक्षीय संघटनात्मक कामाचा अनुभव असुन जगताप गटाकडून त्यांना भविष्यात आमदार म्हणुनच प्रमोट केले जात आहे. एक मोठा राजकीय वारसा असल्याने ते सुध्दा प्रबळ दावेदार ठरु शकतात, परंतू पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी पृथ्वीराज पाटील यांच्या नावाचा उल्लेख करत तालुक्यातील आगामी राजकारणात पृथ्वीराज पाटील हे महत्वाची भुमिका बजावतील असे सांगून आमदार पदाचे ते भक्कम दावेदार आहेत असे ठाम पणे सांगितले आहे. एक प्रकारे तळेकर यांनी पृथ्वीराज पाटील यांच्या आगामी राजकीय वाटचाली बाबत संकेत दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *