करमाळा_चौफेर (शंभू फरतडे✍🏻)
प्रसिद्ध कुस्तीपटू , कुस्तीसम्राट पै .अस्लम काझी यांनी त्यांच्या कुस्ती कारकिर्दीत तब्बल ५१ गदा जिंकल्या आहेत. हा त्यांच्या नावावर असलेला एक ऐतिहासिक आणि अद्वितीय विक्रम मानला जातो. महाराष्ट्रात आणि परराज्यात झालेल्या विविध मोठ्या कुस्ती मैदानांमध्ये त्यांनी आपल्या उत्कृष्ट कौशल्याच्या जोरावर तब्बल ५१ मानाच्या गदा पटकावल्या. जरी त्यांना अधिकृत ‘महाराष्ट्र केसरी’ हा किताब जिंकता आला नसला, तरी त्यांच्या तुफानी कुस्तीमुळे कुस्ती शौकिनांनी त्यांना ‘कुस्ती सम्राट’ ही पदवी बहाल केली आहे.. ते ‘हजारो प्रेक्षकांच्या मनातील “महाराष्ट्र केसरी” म्हणून ओळखले जातात.’
कुस्ती आखाड्यात त्यांचा शड्डू ठोकण्याचा आवाज आणि धिप्पाड शरीरयष्टी संपूर्ण मैदान गाजवून सोडत असे.
सध्या ते सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथे अत्यंत कमी खर्चात ‘शिव छत्रपती कुस्ती केंद्र’ चालवतात. या केंद्राच्या माध्यमातून ते १९ किलो ते १३० किलो वजन गटातील असंख्य नवीन पैलवान घडवण्याचे मोलाचे कार्य करत आहेत.
कुस्तीसम्राट पै. अस्लम काझी यांचा शुक्रवार दि. 29/05/2026 रोजी वाढदिवस असून या निमित्ताने याच दिवशी दुपारी 3 वाजता छत्रपती शिवराय कुस्ती संकुल, कुर्डूवाडी ता. माढा जि. सोलापूर येथे भव्य ‘जंगी कुस्त्यांचे मैदान’ आयोजित केले आहे.या वेळेस खालील कुस्त्या होणार आहेत.
●कुस्तीसम्राट केसरी●
4,51,000/- रूपयांच्या कुस्तीसाठी ,महाराष्ट्र केसरी पै. सिकंदर शेख विरुद्ध महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील यांच्यात महामुकाबला.होणार आहे.
●महाराष्ट्र चॅम्पियन ●
1,51,000/- रुपय इनाम साठी पै. महारूद्र काळेल (कुर्डूवाडी) विरुद्ध पै. वैभव माने (आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर) यांच्यात लढत होणार आहे.
या कार्यक्रमास पालकमंत्री मा. ना. जयकुमार भाऊ गोरे,माजी आमदार ,मा. श्री. संजयमामा शिंदे, यांच्यासह करमाळा, माढा, पंढरपूर, सांगोला तालुक्यातील आजी-माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य, सरपंच, पैलवान व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
●’मैदानातील प्रमुख कुस्त्या’●
महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी, उप महाराष्ट्र केसरी किताब विजेत्या 50 हून अधिक नामवंत मल्लांच्या जोड्या लावण्यात आल्या आहेत. सकाळी 11 ते 02 या वेळेत 100 रु. ते 2000 रु. पर्यंत कुस्त्या नेमल्या जातील.अशी माहीती संयोजकांकडून देण्यात आली.
