May 4, 2026
IMG-20260504-WA0015(2)

(करमाळा_चौफेर शंभू फरतडे)

नारायण आबा पाटील यांनी आमसभेत जलजीवन मिशनचे ठेकेदार व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी टार्गेट केले होते. मात्र निधी अभावी अनेक जलजीवन ची कामे प्रलंबित असल्याने पाणी टंचाई दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या आमदार नारायण पाटील यांनी नुकतीच पुन्हा पाणी टंचाई आढावा बैठक आयोजित केली नंतर बागल गटाकडून देखील पंचायत समिती सभापती उपसभापती घेऊन बैठक घेऊन पाणी टंचाई वर अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या.याच पाणीटंचाई प्रश्नांवर आज खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची बैठक होत आहे. आमदारांनी बैठक घेतल्यानंतर व प्रशासनास उपाययोजनांबाबत सकारात्मक असताना श्रेयवादासाठी बैठाका होत असल्याच्या जनमानसात चर्चा होत्या . जनमानसात व राजकीय वर्तुळात असलेल्या या जनभावनेचा कौल घेऊन करमाळा_चौफेर चौफेर न्युज पोर्टल च्या माध्यमातून आम्ही या बाबत मुद्दे उपस्थित केले होते. पाणीटंचाई साठी बैठका आहेत की राजकीय वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न आहे अशा शंका उपस्थित केल्या होत्या. याच अनुषंगाने फेब्रुवारी महिन्यात करमाळा तालुक्यातील पाणी टंचाई प्रश्नावर खासदार मोहिते-पाटील यांनी लोकसभेत मांडलेल्या प्रश्नांचे व समीती कडून आलेल्या उत्तराचे पत्र खासदार समर्थकांकडून व्हायरल होत आहे. एकंदरीत पाणी प्रश्नावर उशिरा जाग किंवा आमदारांच्या बैठकी नंतर बैठक हे फेक नेरिटिव्ह पुसून काढण्याचा प्रयत्न होत आहे.खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी लोकसभेच्या जलसंपदा स्थायी समितीच्या 19.02.2026 रोजी जल जीवन मिशन अंतर्गत पेमेंट न होण्याचा मुद्दा’ उपस्थित केला होता. यावर स्थायी समिती, G017, EPHA, नवी दिल्ली यांनी दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, कॅबिनेटने जल जीवन मिशनचा कालावधी डिसेंबर 2028 पर्यंत वाढवला आहे. JJM 2.0 अंतर्गत वाढीव निधी आणि पुनर्रचित अंमलबजावणी केली जाणार असून, ग्रामीण पेयजल पुरवठ्यातील संरचनात्मक सुधारणांवर भर दिला जाणार आहे. केंद्राचे अनुदान JJM 2.0 च्या कार्यपद्धतीनुसार दिले जाईल.असे सांगतीले आहे .खासदारांनी जलजीवन मिशन चे पैसे थकल्याचा मुद्दा समितीत मांडला. करमाळा तालुक्यातील अनेक जलजीवन ची कामे पैशांअभावी बंद आहेत. आज कोणत्या ठेकेदाराची बिले थकली, कोणत्या गावची योजना रखडली याचा जाब खासदार विचारू शकतात .त्याच बरोबर ठेकेदार यांच्या अडचणी , नवीन प्रस्ताव किंवा वाढीव निधी साठी या आढावा बैठकीत ठराव संमत करून पुन्हा समिती कडे या संदर्भात पाठपुरवा करू शकतात. सदरच्या बातमी साठी संदर्भात साठीची माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष अमरजीत साळुंके यांनी आज 00:09 वाजता सोशल मीडियावर शेअर केलेल्यापत्रावरून घेतली आहे. आजच्या बैठकीपूर्वीच हे पत्र व्हायरल करून मोहिते पाटील गटाकडून ‘नॅरेटिव्ह सेट’ करण्याचा हा प्रयत्न दिसतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *