करमाळा_चौफेर (✍️शंभू फरतडे)
स्वातंत्र्य सैनिक तथा पत्रकार मा. श्री. नरसिंह मनोहरपंत चिवटे यांच्या ८६ व्या वाढदिवसानिमित्त जाहीर नागरी सत्कार व श्री स्वामी समर्थ स्मारक लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.रविवार दि. य१९ एप्रिल २०२६ रोजी, सायं. ०६वाजताश्री स्वामी समर्थ महाराज स्मारक, श्री तुळशी वृंदावन शेजारी, श्री कमलादेवी रोड, करमाळा येथे हा भव्य सोहळा संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना नेते ठाणे मा. श्री. शशिकांतजी जाधव यांची उपस्थिती असून, माढा लोकसभा शिवसेना संपर्क प्रमुख डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या हस्ते होणार आहे. 
या कार्यक्रमासाठी माजी मंत्री सिध्दरामजी म्हेत्र, अक्कलकोट स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर समिती चे अध्यक्ष महेशजी इंगळे , अन्नछत्र मंडळाचे संस्थापकअध्यक्ष. जन्मेजयराजे भोसले, व कार्यकारी अध्यक्ष, अमोलराजे भोसले, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार
तसेच किरण सोनटक्के, जिल्हाप्रमुख परभणी , आनंदजी भरोसे, शिव व्याख्याते लातूर,किरणजी कोरे ,युवासेना सचिव मराठवाडा , बाजीरावजी चव्हाण ,मोहिनीताई सावंत नगराध्यक्ष करमाळा ,तालुका संपर्क प्रमुख रवि आमले यांच्यासह मुक्ताई भजनी मंडळ, करमाळा व श्री स्वामी समर्थ भक्त प्रतिनिधी ,रेश्मा कदम, श्यामा बोधे, सविता चिवटे, जयश्री वीर यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमासाठी करमाळा तालुक्यातील स्वामी भक्त, चिवटे परिवारावर प्रेम करणाऱ्या सर्व मांता भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन मुख्यमंत्री व उप-मुख्यमंत्री वैद्यकीय साह्यता कक्षाचे माजी कक्ष प्रमुख मंगेश मंदाकिनी नरसिंह चिवटे यांनी केले आहे.

