करमाळा चौफेर

संगमनेरमधील चिमुकलीवर झालेल्या अमानवीय ॲसिड हल्ल्याचे पडसाद करमाळ्यात उमटले असून, सराफ सुवर्णकार समितीच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. तालुकाध्यक्ष मनोहर बुऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनात खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून पीडितेला तातडीने आर्थिक व वैद्यकीय मदत देण्याची विनंती केली आहे.

यासोबतच ॲसिड विक्रीवर कडक निर्बंध लागू करून परवाना प्रणालीची काटेकोर अंमलबजावणी करावी, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी जनजागृती मोहिमा राबवाव्यात आणि पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे, अशीही मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे
निवेदन देताना बुर्हाडे यांच्यासह जेष्ट भाजपा कार्यकर्ते संजय घोरपडे, किरण बोकन, नरेंद्रसिंह ठाकुर, प्रा. शिवाजीराव बंडगर, सचिन चव्हाण, राजकुमार देशमुख, कृष्णा बोराडे, विष्णू रंधवे ,अमोल बागडे, दुर्गेश बोकन, भास्कर पवारआदी जण उपस्थित होते.

