करमाळा चौफेर (मुंबई प्रतिनिधी)
मराठा उद्योजक लॉबीच्या वतीने नवी मुंबईत आयोजित ‘१५ प्रकारचे सरबत बनवणे’ प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न झाले. २१ मार्च रोजी झालेल्या या शिबिरात सुमारे ४० समाजबांधवांनी सहभाग नोंदवत व्यवसायाचे धडे गिरवले. मराठा उद्योजक लॉबीतर्फे दर महिन्याला अशा मोफत शिबिरांचे आयोजन करून समाजातील तरुणांना व महिलांना स्वावलंबी बनवण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे.
प्रशिक्षक सौ. तृप्ती चौगुले यांनी अत्यंत प्रभावी मार्गदर्शन केले. या उपक्रमासाठी ऐरोली संघटिका पल्लवीताई घाटगे, नवी मुंबई शहर संघटक अनिलदादा जगदाळे, कोपरखैरणे संघटक ज्ञानेश्वर गोंड यांच्यासह हनुमान गायकवाड, प्रेम काळे, वनिता काटे आणि चांदणी मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले. आतापर्यंत हँडक्राफ्ट, नथ बनवणे आणि दिवाळी फराळ अशा विविध शिबिरांच्या माध्यमातून अनेक यशस्वी उद्योजक घडले आहेत.

पुढील महिन्यात अवघ्या २००० रुपयांच्या गुंतवणुकीत दरमहा १५ ते ५० हजार रुपये कमावून देणारा ‘बलून डेकोरेशन’ व्यवसाय प्रशिक्षण वर्ग आयोजित केला जाणार आहे. १८ वर्षांवरील कोणालाही, अगदी शिक्षण घेतानाही हा व्यवसाय सहज करता येईल, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
नवी मुंबईत मराठा उद्योजक लॉबीतर्फे दर महिन्याला आयोजित केल्या जाणाऱ्या व्यवसाय प्रशिक्षण शिबिरांचा तरुण आणि महिलांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष श्री. वैभव शाहूराव फरतडे यांनी केले आहे. या शिबिरांमध्ये केवळ व्यवसायाचे प्रशिक्षणच दिले जात नाही, तर भांडवल उभारणी, कच्च्या मालाची उपलब्धता, आवश्यक शासकीय परवाने आणि मार्केटिंगच्या प्रभावी तंत्रांबाबत सखोल मार्गदर्शन केले जाते.
अल्प गुंतवणुकीत स्वतःचा उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी हे एक उत्तम व्यासपीठ ठरत असून, आतापर्यंत अनेक यशस्वी उद्योजक या उपक्रमातून घडले आहेत. व्यवसायाची संपूर्ण माहिती एकाच छताखाली मिळत असल्याने नवीन उद्योजकांना मोठी मदत होत आहे. अधिक माहितीसाठी किंवा नाव नोंदणीसाठी ८३०८९३१२८९ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन वैभव फरतडे यांनी केले आहे.

