March 16, 2026
IMG-20260316-WA0091

पुणे (विशेष प्रतिनिधी): बूट आणि लेदर वस्तूंच्या प्रीमियम देखभालीसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘United Shine – Premium Shoe & Leather Care’ या आगळ्यावेगळ्या स्टार्टअप संकल्पनेच्या पहिल्या आऊटलेटचा शुभारंभ नुकताच विमाननगर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या नव्या उपक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. या कार्यक्रमाला अभिजीत घाटगे (संस्थापक – Pocket Café), वैभव शाहुराव फरतडे (प्रदेशाध्यक्ष – मराठा उद्योजक लॉबी), कृष्णा निडवंचे (संस्थापक – नादब्रह्म इव्हेंट्स), अमित बागवे व सौ. रचना बागवे (संस्थापक – अर्थसंकेत ), समीर शिनागरे (संस्थापक – Jaggery Tales), सौ. सुमेधा पठारे (नगरसेवक – पुणे महानगरपालिका) आणि डॉ. दादा कोंडे (नगरसेवक – पुणे महानगरपालिका) कृषिराज चव्हाण कोकण मुंबई संपर्क प्रमुख मराठा उद्योजक लॉबी ,प्रवीण पाटील पुणे जिल्हाध्यक्ष मराठा उद्योजक लॉबी ,संतोष रोंगे यांची
प्रमुख उपस्थिती होती.

या प्रसंगी उपस्थित पाहुण्यांनी पुणे शहरात अशा प्रकारच्या प्रीमियम शू आणि लेदर केअर सेवांची गरज अधोरेखित करत या नव्या उपक्रमाचे कौतुक केले.

‘United Shine’ या स्टार्टअपची संकल्पना ‘बाराखडी उद्योजकतेची’ या पुस्तकाचे लेखक विजय गोपाळराव पवार आणि ‘इनोव्हेटिव्ह लॉन्ड्री बास्केट’ या व्यवसायाचे संस्थापक वैभव होळ सांबरे या दोन तरुण उद्योजकांनी प्रत्यक्षात आणली आहे. या स्टुडिओमध्ये शू क्लिनिंग, स्नीकर्स क्लिनिंग, लेदर शू पॉलिशिंग तसेच लेदर बॅग आणि इतर लेदर वस्तूंचे रिस्टोरेशन अशा प्रीमियम सेवा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.तसेच या आऊटलेटच्या माध्यमातून ‘Veltan’ या नव्या लेदर प्रॉडक्ट्स ब्रँडचीही सुरुवात करण्यात आली आहे. या ब्रँडअंतर्गत हँडमेड कोल्हापुरी चप्पल, प्रीमियम लेदर शूज, लेदर बॅग्स, लेदर बेल्ट्स आणि लेदर वॉलेट्स अशी विविध उत्पादने ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहेत.

पुण्यात सुरू झालेल्या या नाविन्यपूर्ण स्टार्टअप उपक्रमाचे शहरातील विविध स्तरातून स्वागत आणि कौतुक होत आहे.

तरुण उद्योजकांनी नव्या कल्पना आणि गुणवत्तापूर्ण सेवांच्या माध्यमातून व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकणे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. ‘United Shine’ या उपक्रमाच्या माध्यमातून बूट व लेदर वस्तूंच्या प्रीमियम सेवांची संकल्पना पुण्यात सुरू होत आहे, ही अभिनव आणि प्रेरणादायी सुरुवात आहे.

या व्यवसायाला भविष्यात मोठे यश लाभो, अधिकाधिक ग्राहकांचा विश्वास मिळो आणि अशाच प्रकारे नव्या उद्योजकांना प्रेरणा मिळत राहो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा.

श्री वैभव शाहूराव फरतडे — प्रदेशाध्यक्ष
मराठा उद्योजक लॉबी

पत्ता:
Shop No. 3, Shalimar Triumph,
Opp. Viman Prestige Society,
Clover Park, Viman Nagar,
Pune – 411014.

1 thought on “पुण्यातील विमाननगरमध्ये ‘युनायटेड शाईन’ या हटके स्टार्टअपचा शानदार शुभारंभ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *